ETV Bharat / state

ओवैसी यांनी केली औरंगाबाद शहरातील तीन उमेदवारांची घोषणा

शहरातील मतदारसंघात उमेदवार निवडीवरून नाराजीनाट्य होऊ नये, यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी या तीनही मतदारसंघातील उमेदवारीचा चेंडू पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या न्यायालयात टोलवला होता. अखेर ओवैसी यांनी शहरातील तीनही मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 28, 2019, 5:43 PM IST

औरंगाबाद - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून औरंगाबाद शहरातील तीनही मतदारसंघाच्या उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. पुर्वमधून डॉ. गफ्फार कादरी, मध्यमधून नासेर सिद्दीकी तर पश्चिममधून अरुण बोर्डे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पक्षामध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात एमआयएमला चांगली मते मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली होती. विशेषतः म्हणजे इम्तियाज जलील आमदार राहिलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात इच्छुकांची लक्षणीय संख्या पाहायला मिळाली. नासेर सिद्दीकी यांच्या उमेदवारीची मध्य विधानसभा मतदार संघात बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील मतदारसंघात उमेदवार निवडीवरून नाराजीनाट्य होऊ नये, यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी या तीन्ही मतदारसंघातील उमेदवारीचा चेंडू पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कोर्टात टोलवला होता. अखेर ओवेसी यांनी शहरातील तीनही मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे डॉ. गफ्फार कादरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कादरी गेल्या निवडणुकीत अवघ्या 4200 मतांनी पराभूत झाले होते.

हेही वाचा - औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मित्र पक्षाचा सेनेला धोका

महापालिकेत गटनेता म्हणून काम केलेले नासेर सिद्दीकी यांची उमेदवारी अनपेक्षित होती. नासेर सिद्दीकी हे इम्तियाज जलील यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यापैकी एक समजले जातात. परंतु लोकसभा निवडणुकीत घडलेला चमत्कार पाहता मध्यमधून लढणाऱ्या इच्छूकांची संख्या वाढली होती. तीसहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्यानंतर उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर नासेर सिद्दीकी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली आहे. मध्य मध्ये इच्छुकांची संख्या पाहता पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - मराठवाडा : वर्चस्वासाठी सेना-भाजपची रस्सीखेच, तर आघाडीची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड

राखीव असलेल्या पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे अरुण बोर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बोर्डे यांची या मतदारसंघातून तयारी सुरू होती. औरंगाबाद महानगर पालिकेमध्ये अरुण बोर्डे यांची पत्नी विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त आहेत.

हेही वाचा -मराठवाडा - आघाडीला अस्तित्व टिकवण्याचे आव्हान; आढावा....

Intro:एमआयएमचे अध्यक्ष असोउद्दीन ओवेसी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून औरंगाबाद शहरातील तीनही मतदार संघाच्या उमेदवारांची नाव जाहीर केली. पुर्वमधून डॉ. गफ्फार कादरी, मध्यमधून नासेर सिद्दीकी तर पश्‍चिममधून अरुण बोर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. Body:औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पक्षामध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात एमआयएमला चांगली मते मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली होती. विशेषतः म्हणजे इम्तियाज जलील आमदार राहिलेल्या औरंगाबाद मध्य मतदार संघात इच्छुकांची लक्षणीय संख्या पाहायला मिळाली. नासेर सिद्दीकी यांच्या उमेदवारीची मध्य विधानसभा मतदार संघात बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.Conclusion:शहरातील मतदार संघात उमेदवार निवडीवरून नाराजीनाट्य होऊ नये यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी या तीन्ही मतदारसंघातील उमेदवारीचा चेंडू पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कोर्टात टोलवला होता. अखेर ओवेसी यांनी शहरातील तीनही मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे डॉ. गफ्फार कादरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कादरी गेल्या निवडणुकीत अवघ्या 4200 मतांनी पराभूत झाले होते. महापालिकेत गटनेता म्हणून काम केलेले नासेर सिद्दीकी यांची उमेदवारी अनपेक्षित होती. इम्तिया जलील यांनी ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. नासेर सिद्दीकी हे इम्तियाज जलील यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यापैकी एक समजले जातात. परंतु लोकसभा निवडणुकीत घडलेला चमत्कार पाहता मध्यमधून लढणाऱ्या इच्छूकांची संख्या वाढली होती. तीसहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्यानंतर उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर नासेर सिद्दीकी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली आहे. मध्य मध्ये इच्छुकांची संख्या पाहता पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर राखीव असलेल्या पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे अरुण बोर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बोर्डे यांची या मतदारसंघातून तयारी सुरू होती. औरंगाबाद महानगर पालिकेच्या अरुण बोर्डे यांची पत्नी विरोधी पक्षनेते पदी नियुक्त आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.