सोयगाव - सोयगाव तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींसाठी नव्याने सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. शहरातील बचत भुवन हॉलमध्ये उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रविण पांडे यांनी आरक्षण सोडत जाहीर केली. दरम्यान यावेळी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एसी, एसटी प्रवर्गाचे आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.
'अशी' जाहीर झाली आरक्षणाची सोडत
इतर मागास प्रवर्ग महिला - घानेगावतांडा, हनुमंतखेडा, जरंडी, माळेगाव पिंप्री, वरखेडी बु. व निमखेडी येथील ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
सर्वसाधारण महिला - फर्दापुर, जगंलाताडां, उप्पलखेंडा, वरखेडी खु., बहुलखेंडा, नादगावतांडा, वाडीसुतांडा, निभोरा, जामठी, शिंदोळ, मोलखेडा आणि सावरखेंडा येथील ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
इतर मागास प्रवर्ग पुरुष - वरठाण, वनगाव, किन्ही, पळासखेडा, आमखेडा आणि घोसला ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे इतर मागास प्रवर्ग पुरुषांसाठी राखीव आहे.
सर्वसाधारण पुरुष - बनोटी, पळाशी, वाकडी, निबायंती, रवळा जावळा, गोंदेगांव, सावळदबारा, पिपळवाडी, टिटवी, दस्तापुर, नांंदागांव आणि गलवाडा या ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे सर्वसाधारण पुरुषांसाठी आहे.
अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण कायम
दरम्यान न्यायालयाने अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षण कायम ठेवले असल्याने, पूर्वी काढलेल्या आरक्षण सोडती कायम ठेवण्यात आल्या आहेत. ही आरक्षण सोडत पुढील प्रमाणे आहे.
अनुसूचित जमाती - मोहलाई महिला, जंगली कोठा महिला, वडगाव (ती) महिला, कंकराळा रावेरी सर्वसाधारण पुरुष, तिडका सर्वसाधारण पुरुष, देव्हारी सर्वसाधारण पुरुष
अनुसूचित जाती- कवली महिला, पोहरी महिला, डाभा सर्वसाधारण पुरुष, तितूर आणि मुखेड सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण जाही करण्यात आले आहे.
हेही वाचा - एल्गार परिषदेत झळकले कोरेगाव-भीमा दंगलीसंदर्भातील अटकेतील कार्यकर्त्यांचे पोस्टर