औरंगाबाद : सध्या राज्यात जे काही चालले त्यावरून राज्यात समाधान कारक स्थिती नाही असे दिसते. प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या पाहताना, आता कोणाला काय बोलावे, कसे शब्द वापरले जातात, याचे भान राहील नाही असे दिसते. सर्वांनी आपल्या पक्षातील वाचाळवीर बोलत असतील तर त्यांनी नोंद घ्यावी, आम्ही आमच्या राष्ट्रवादी पक्षात काळजी घेत आहोत. सर्वच पक्षांनी नोंद घ्यावी, पक्षांनी त्यांना समजून सांगावे. वेळ पडली तर कारवाई करावी. यामुळे राज्यातील महत्वाचे मुद्दे बाजूला पडतात, अशी टीका राष्ट्रवादी नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar Critics) यांनी औरंगाबादमधील कार्यक्रमात केली. तर दुसरीकडे त्यांनी संजय शिरसाटांचे नाव न घेता मंत्रीमंडळ (cabinet expansion) विस्तारावरून त्यांना टोला (Ajit Pawar Criticized Sanjay Shirsat ) लगावला.
अनेकजण मंत्रीपदाच्या तयारीत : जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहेत. एवढे मंत्री मिळाले अजून मिळतील अशी अपेक्षा आहे. अनेक जण तर सुटबुट घालून तयार आहेत. फोन आला की तयार राहायचे. आमच्या पुण्याला एवढे आमदार आहे, मात्र एकच मंत्रीपद मिळाले अशी मिश्किल टीका अजित पवारांनी संजय शिरसाट यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. तर उपस्थितांना संबोधित करताना सोशल मीडियाचा माध्यमातून जग जवळ आले. एका बटणावर माहिती मिळते. विद्यापीठाच्या अधिसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत सर्व जाती धर्माच्या उमेदवारांना न्याय दिला याचा आनंद आणि कौतुक वाटते. आम्ही सत्तेत असो की नसो आता चांगलं काम करा. सत्ता येत-जात राहते मात्र वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा नवी संधी मिळेल त्यावेळी चांगलं काम करणे शक्य होते, असे देखील अजित पवार यांनी सांगितले.
पाणी कुठे मुरत कळत नाही : शहरात आल्यावर काही नागरिकांना भेटलो तेव्हा पाण्याच्या समस्या आहे, असे सांगण्यात आले. न्यायालयाने हस्तक्षेप करून देखील सात दिवसाला पाणी मिळत आहे असे त्यांनी सांगितले. परिस्थिती सुधारत नाही. जास्त पाणी मिळावे म्हणून आम्ही प्रकल्प घोषित केला. त्यावेळी चारशे कोटीचा प्रकल्प आज 2800 कोटींवर गेला. कुठ पाणी मुरतंय कळत नाही. एवढे मंत्री असताना समस्या येती कशी अनेक नेत्यांना निवडून दिले याला दोष कोणाला द्यायचा. उमेदवाराला की मतदाराला हे कळत नाही, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली. तर महविकस आघाडी काळात चांगले निर्णय घेतले, त्यांची अमलबजावणी सुरू करण्याआधी राज्यात सत्ता परिवर्तन झाले. नावाच्या वादात न पडता काम करावे, कोणी म्हणत धर्मवीर संभाजी नाव द्या, तर कोणी काही म्हणत इतिहास इतिहासाच्या जागी आहे. नव्या पिढीला यात काही रस आहे असे वाटत नाही. भारतीय म्हणून काम केले तर चांगले काम होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.