ETV Bharat / state

चढ्या दराने खत विक्री अंगलट, कन्नड तालुक्यातील पाच कृषिसेवा केंद्राचे परवाने निलंबित - Aurangabad latest news

खत साठा शिल्लक असूनही खत शिल्लक नसल्याचे शेतकऱ्याना सांगणे, जवळच्या व्यक्तिचे आधार लिंकिंग करून यूरिया खताचा तुटवडा निर्माण करणे, अशा तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.

चढ्या दराने खत विक्री अंगलट,  कन्नड तालुक्यातील पाच कृषीसेवा केंद्राचे परवाने निलंबित

author img

By

Published : Aug 17, 2020, 12:03 PM IST

कन्नड - (औरंगाबाद) - कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसात तासंतास भिजूनही यूरिया खत मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहार. यावर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शेतकऱ्यांना तत्काळ खत उपलब्ध करून द्यावा. तसेच खतांचा काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली होती. यामुळे खडबडून जागे झालेल्या कृषी विभागाने तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्राची तपासणी करून खत विक्रत्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

तालुक्यातील प्रशांत कृषी सेवा केंद्र कन्नड, जय महाविर कृषी सेवा केंद्र नागद, नम्रता फर्टिलायझर नाचनवेल, आर्यन कृषी सेवा केंद्र पिशोर, पंकज एजन्सी चिकलठाण या कृषी सेवा केंद्रांकडून चढ्या दराने खत विक्री, तसेच खत साठा शिल्लक असूनही खत शिल्लक नसल्याचे शेतकऱ्याना सांगणे, जवळच्या व्यक्तिचे आधार लिंकिंग करून यूरिया खताचा तुटवडा निर्माण करणे, अशा तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.

यामुळे तालुका कृषी आधिकारी बाळराजे मुळीक, प.स. तालुका कृषी अधिकारी दिनकर जाधव यांनी संयुक्त पणे या कृषी सेवा केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत त्यांना रासायनिक खताचे दरपत्रक फलकावर न लावणे, विक्री केलेल्या खताचा तपशील नोंदवहीत नमूद न करणे, अशा नियम बाह्य त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या पाच कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले. तसेच परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद यांचेकडे कारवाई प्रस्तावित करणेबाबत अहवाल सादर केले होते.

यामुळे या खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी दिली आहे. तालुक्यात कृषि केंद्र परवाने निलंबित मुळे मोठी खळबळ उडाली असून तालुक्यात प्रथमच अशी कारवाई झाल्याने कृषी सेवा केंद्र चालकाचे दाबे दणाणले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.