औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी येथे निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर ठाणे येथे निवडणूक लढवण्याचा आव्हान त्यांना दिले. मात्र त्यांनी स्वीकारले नाही आता वार्डात निवडणूक लढवण्याचे त्यांनी सांगितले, ते जर वॉर्डांत निवडणूक लढवायला तयार असतील तर मी देखील लढतो अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तर ते कोणतेच आव्हान स्वीकाराला तयार नाहीत, त्यामुळे आता त्यांना एक नवीन सोप आव्हान देतो ते म्हणजे, अधिवेशन सुरू होण्याआधी त्यांनी राज्यपाल बदलून दाखवावे. महाराष्ट्रात राहून त्यांनी अनेक वेळा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. मात्र त्यावर कोणीही बोलले नाहीत. मुख्यमंत्री दिल्लीला जात होते मात्र ते फक्त स्वतःच्याच कामासाठी जात होते. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
नागरिकांनी दाखवलं: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वरळीतील सभेला नागरिकांनी पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. मात्र कोणाच्या फ्लॉप शोवर बोलणार नाही. वरळी आणि इतरही ठिकाणी नागरिकांनी चित्र दाखवले आहे. प्रामाणिक आणि गद्दार यातला फरक लोकांनी दाखवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आले नाही? तर ते त्यांना विचारा. ते तर डावस मध्ये देखील गेले नव्हते. वरळी येथील नागरिकांना माहिती आहे, आम्ही त्यांच्या घराघरापर्यंत जाऊन मदत पोहोचवलेली आहे. असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील प्रकल्प बाहेर जात आहेत यावर समोरासमोर बसून चर्चा करा असे सांगितले. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अनेक प्रकल्प आजही जात आहेत असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
खैरे यांची टीका: आदित्य ठाकरे यांच्या सभेमध्ये पोलिसांकडून हलगर्जीपणा केला. पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर काल वैजापूर येथील महालगाव येथे दगडफेक झाली होती. या दगडफेकीमध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा असून पोलिसांनी सहकार्य केले नाही. आदित्य ठाकरे यांनी डीजे चालू द्या असे सांगितल्यानंतर सुद्धा पोलिसांनी डीजे बंद केला. त्यावरून हे सर्व घडून आले. या सर्व गोष्टीचा जबाब मिलेगा, लेकिन अभी नही आदित्य ठाकरे साहेब जाने के बाद बोरणारे को देख लेंगे असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी इशारा दिला.
बोरनारे यांनी नाकारले : आदित्य ठाकरे यांच्या सभेदरम्यान झालेल्या गोंधळाला आम्ही जबाबदार नाही. अशा शब्दात एकनाथ शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी उत्तर दिले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे आमच्यावर आरोप करत आहेत. आम्ही सामान्य आमदार आहोत, अशा पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कृत्य करणार नाही. अशा शब्दात आमदार रमेश बोरणारे यांनी उत्तर दिले आहे.