औरंगाबाद - शहरामध्ये कुत्र्यांनी चावा घेतलेल्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा नागरिकांना औरंगाबाद महानगरपालिकेच्या पाच केंद्रांवर रेबीजची लस दिली जाते. सध्या महानगरपालिकेकडे रेबीज लसीचे ९ हजार डोस उपलब्ध असल्याची माहिती महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे.
दोन वर्षात ४ हजार ९७जणांचे तोडले लचके -
औरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून कुत्रा चावल्याचे घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. शहरामध्ये दिवसाला दहा ते पंधरा जणांना कुत्रा चावल्याच्या घटना समोर येत आहेत. दोन वर्षात तब्बल ४ हजार ९७ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.
महानगरपालिकेकडे रेबीज लसीचे ९ हजार डोस -
कुत्रा चावला की त्या व्यक्तीला रेबीज लस दिली जाते. ही रेबीज लस महानगरपालिकेच्या चार आरोग्य केंद्रांवर आणि घाटी रूग्णालयात उपलब्ध आहे. सध्या महानगरपालिकेकडे रेबीज लसीचे ९ हजार डोस उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोड यांनी दिली.
2020 या वर्षातील कुत्र्यांनी चावा घेतल्याची आकडेवारी -
- जानेवारी - 430
- फेब्रुवारी - 418
- मार्च - 380
- एप्रिल - 0 लॉकडाऊनमुळे रूग्ण नाही
- मे - 0 लॉकडाऊनमुळे रूग्ण नाही
- जून- 0 लॉकडाऊनमुळे रूग्ण नाही
- जुलै - 158
- ऑगस्ट - 220
- सप्टेंबर - 360
- ऑक्टोबर - 365
- नोव्हेंबर - 380
- डिसेंबर - 410
एकूण ३ हजार १२१ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला.
2021 या वर्षातील आकडेवारी(१५ मार्चपर्यंत) - जानेवारी - 392
- फेब्रुवारी - 408
- मार्च - १५ तारखेपर्यंत 176
२०२१ मार्च महिन्याच्या १५ तारखेपर्यंत एकूण ९७६ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.