ETV Bharat / state

अब्दुल सत्तारांच्या पुत्राने दिला युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा - sillod

अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी केली. वडिलांची हकालपट्टी होताच समीर सत्तार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.

अब्दुल समीर यांचा युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
author img

By

Published : Apr 26, 2019, 10:49 AM IST

औरंगाबाद - काँग्रेसचे सिल्लोड मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांचे पुत्र अब्दुल समीर यांनी युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देत असताना पक्षामध्ये अल्पसंख्यांक समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समीर सत्तार यांनी केला आहे.

समीर सत्तार यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे सुपूर्त केला. शिवाय समीर सत्तार यांनी पक्षदेखील सोडल्याची माहिती दिली आहे. अब्दुल समीर यांच्याशी संपर्क साधला असता, निवडणुकीच्या काळात युवा प्रदेशाध्यक्ष असताना आपल्याकडे कुठलीही जबाबदारी पक्षाने दिली नाही. अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंड पुकारले. इतकेच नव्हे तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला. सत्तार यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी केली. वडिलांची हकालपट्टी होताच समीर सत्तार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुढील दिशा लवकरच जाहीर करू असे समीर सत्तार यांनी सांगितले.

Intro:काँग्रेसचे सिल्लोड मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी झाल्या नंतर त्यांचे सुपुत्र आणि अब्दुल समीर यांनी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. Body:राजीनामा देत असताना पक्षामध्ये अल्पसंख्यांक समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समीर सत्तार यांनी केलाय. Conclusion:समीर सत्तार यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे सुपूर्त केलाय. इतकच नाही तर समीर सत्तार यांनी पक्षाला देखील सोडल्याची माहिती दिली आहे. अब्दुल समीर यांच्याशी संपर्क साधला असता निवडणुकीच्या काळात युवा प्रदेशाध्यक्ष असताना आपल्याकडे कुठलीही जबाबदारी पक्षाने दिली नाही, अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंड पुकारलं इतकच नाही तर औरंगाबादचे काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला. सत्तार यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी केली. वडिलांची हकालपट्टी होताच समीर सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुढील दिशा लवकरच जाहीर करू असं समीर सत्तार यांनी सांगितलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.