औरंगाबाद - पुंडलिक नगर भागातील 32 वर्षीय मजुराने आत्महत्या केली आहे. मला माफ करा, असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. ही घटना शनिवारी (दि. 17 एप्रिल) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
पुंडलिक नगर भागातील बंमबार येथील रहिवासी गुलाब रमेश त्रिकाल (वय 32 वर्षे) हा मजुरी करत होता. काल (दि. 17 एप्रिल) दुपारच्या सुमारास गुलाब याने राहत्या घरी छताला लोखंडी रॉडला साडीने गळफास घेतला. ही बाब घरातील व्यक्तीच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ गुलाबला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
'मला माफ करा' अशी सुसाईड नोट
गुलाबचा 9 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्याला 3 वर्षांची मुलगी आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने 'मला माफ करा', अशी सुसाईट नोट लिहिली होती. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - औरंगाबाद : 'ब्रेक द चेन' अंतर्गत लावलेल्या कडक निर्बंधांमध्ये बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश