ETV Bharat / state

औरंगाबादमधील नगरसेवकाने तयार केले 'हे' अ‌ॅ‌‌प; तक्रार निवारणात होणार मदत

तक्रार निवारण करण्यासाठी अ‌ॅ‌‌पमध्ये वेगवेगळे पर्याय देण्यात आले आहेत. पाणी, रस्ते, वीज, उद्यान, स्वच्छता असे वेगवेगळे पर्याय असून, नेमकी आपली तक्रार कोणत्या पर्यायात येते हे लक्षात घेऊन ती तक्रार नोंदवावी लागते. त्यानुसार संबंधित विभागाकडे ती तक्रार वर्ग होते. त्याचबरोबर, आपल्याला ऑनलाइन तक्रार नोंदवता येत नसेल तर त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला असून त्यावर फोन करूनही आपली तक्रार नोंदवणे शक्य होते.

डेलीनीड अ‌ॅप
डेलीनीड अ‌ॅप
author img

By

Published : Oct 6, 2020, 7:42 PM IST

औरंगाबाद- कोरोनामुळे शक्यतो घरीच रहा, असे म्हटले जात असले तरी अनेक कामांसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागते. आपल्या समस्या मांडण्यासाठी पालिकेत, तर आरोग्य सुविधेसाठी रुग्णालयात जावे लागते. तर कधी आपल्या भागातील समस्या मांडण्यासाठी नगरसेवक किंवा प्रभाग कार्यालयात जावे लागते. मात्र, आता औरंगाबाद शहरातील नागरिकांना ही सर्वकामे आपल्या मोबाईलच्या एका क्लीकवर करता येणार आहे. भाजपचे माजी उपमहापौर व गटनेते प्रमोद राठोड यांनी तयार केलेल्या अप्लिकेशनद्वारे हे शक्य होणार आहे.

माहिती देताना भाजपचे माजी उपमहापौर व गटनेते प्रमोद राठोड

शहरातील समस्या मांडण्यासाठी एखादी सोपी यंत्रणा असावी, अशी मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून नेहमी करण्यात येते. मात्र, या मागणीला पालिका प्रशासन गांभीर्याने घेताना दिसत नाही. औरंगाबाद महानगर पालिकेचे गटनेता म्हणून काम करत असताना प्रमोद राठोड यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. प्रमोद राठोड यांनी आपल्या वॉर्डातील समस्या सोडवण्यासाठी काही वर्षांपूर्वी 'डेलीनीड' नावाचे अ‌ॅप सुरू केल होते. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवता येईल, अशा पद्धतीने या अ‌ॅपची रचना करण्यात आली होती. या अप्लिकेशनमध्ये आपली तक्रार टाकल्यानंतर त्या तक्रारीबाबत पुढे काय झाले याची माहिती मोबाईलवर कळते.

तक्रार निवारण करण्यासाठी अ‌ॅपमध्ये वेगवेगळे पर्याय देण्यात आले आहेत. पाणी, रस्ते, वीज, उद्यान, स्वच्छता असे वेगवेगळे पर्याय असून, नेमकी आपली तक्रार कोणत्या पर्यायात येते हे लक्षात घेऊन ती तक्रार नोंदवावी लागते. त्यानुसार संबंधित विभागाकडे ती तक्रार वर्ग होते. त्याचबरोबर, आपल्याला ऑनलाइन तक्रार नोंदवता येत नसेल तर त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला असून त्यावर फोन करूनही आपली तक्रार नोंदवणे शक्य होते.

त्याचबरोबर, अप्लिकेशनमध्ये शहरातील रुग्णालय, त्यातील प्रमुख डॉक्टर यांचे क्रमांक देण्यात आले आहेत. रुग्णवाहिका किंवा डॉक्टरांची गरज असल्यास अ‌ॅपद्वारे तातडीची सेवा मिळवता येणार आहे. तसेच, आपल्या घराजवळ साप आढळून आल्यास त्याबाबतही मदत घेता येणार आहे. कोरोना काळात नागरिकांना तक्रारी देण्यासाठी पालिका किंवा नागरसेवकांपर्यंत यावे लागू नये यासाठी ही व्यवस्था केल्याची माहिती माजी उपमहापौर आणि गटनेते प्रमोद राठोड यांनी दिली. अ‌ॅपद्वारे वीजबिल, बस तिकीट, विमान तिकीट, पाण्याचा किंवा घराचा कर भरण्याची सुविधा, असे अनेक पर्याय देण्यात आले आहेत. नागरिकांसाठी हे अप्लिकेशन उपयोगी पडेल. असे मत प्रमोद राठोड यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- '...अन्यथा नागरिकांना वीजबिल भरण्यापासून रोखू'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.