औरंगाबाद - कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. सकाळी ११ रुग्ण आढळून आले असताना दुपारी नव्याने ८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील रुग्णसंख्या १२८वर जाऊन पोहोचली आहे. शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या नूर कॉलनीत ४ तर असेफिया कॉलनीतील ४ असे एकूण ८ रुग्ण आढळून आले आहेत.
सोमवारपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. सोमवारी २९, मंगळवारी २७ तर बुधवारी दुपारपर्यंत कोरोनाचे १९ रुग्ण वाढले आहेत. तीन दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच, आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात कोरोनाचे ११ रुग्ण वाढल्याचे निष्पन्न झाले. त्यात नूर कॉलनी येथील ८, भीमनगर १, जय भीमननगर १, गारखेडा गुरुदत्त नगर येथील एका रुग्णाचा समावेश होता. मात्र, दुपार नंतर ८ नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोना बधितांची संख्या १२८ वर पोहोचली आहे. यात २३ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत, तर ७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- #कोरोना_ईफेक्ट : 'कारखान्यांची धडधड थांबली; अन् अनेकांच्या हातचा रोजगार गेला'