ETV Bharat / state

Chhatrapati Sambhaji Nagar Riots: छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीत 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - दोन गटात वाद

छत्रपती संभाजीनगर येथे रामनवमीनिमित्त मंदिरात तयारी सुरू असताना दोन गटात वाद झाला होता. या दंगलीत 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही दंगल बुधवारी झाली होती.

Chhatrapati Sambhaji Nagar Riots
छत्रपती संभाजी नगर येथील दंगल
author img

By

Published : Mar 31, 2023, 12:23 PM IST

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीत 51 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री दोन गटांकडून किराड पुरा मंदिर परिसरात दगडफेक झाली होती. त्या दगडफेकीत ही व्यक्ती जखमी झाली होती. खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरू असतानाच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. तर आणखी एक व्यक्ती गंभीर असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री 13 वाहने जाळल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

दोन गटात झालेली हाणामारी : एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शेख मुनिरुद्दीन असे मृताचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा परिसरातील राम मंदिराजवळ दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुमारे 500 जणांच्या जमावाने दगड आणि पेट्रोलच्या बाटल्या फेकल्या. त्यामुळे या हल्ल्यात 10 पोलीस व 12 जण जखमी झाले आहेत. शहरात आता सामान्य स्थिती पूर्ववत झाली आहे. शहरातील विविध संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रशासनाने एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात केल्या आहेत. शांतता राखण्यासाठी सुमारे 600 पोलिस कर्मचारी पहारा देत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

वाहनांची जाळपोळ : रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरात भागात 2 गटात तुफान राडा झाला होता. या हाणामारीत दगडफेक झाली होती, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली होती. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत गर्दी पांगविली होती. आता तेथील परिस्थिती शांत आहे. यावेळी काही समाजकंटक लोकांनी दगडफेक केली. त्यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या वाहनांसोबत खासगी वाहनांची जाळपोळ देखील केली होती. सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी घटना कळताच धाव घेतली होती. पोलिसांनी ही परिस्थिती देखील आटोक्यात आणली. हा वाद पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

हेही वाचा : Maharashtra Clashes : राममंदिराबाहेर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात वाद, 10हून अधिक वाहने पेटविली!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.