औरंगाबाद- बुलेट, फ्रीज, गिरणी इत्यादी महागड्या वस्तू स्वस्तात देण्याचे आमिष दाखवत ३० जणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आणि एक महिले विरोधात पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वंभर गावंडे, सुरेखा मनाजी म्हेत्रे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
संजयनगर बायजीपुरा येथील अंगणवाडी सेविका संगीता कस्तुरे या ८ मे'ला महिला दिनानिमित्त पुंडलीकनगर येथे गेल्या होत्या. तेथे त्यांना सुरेखा म्हेत्रे नावाची महिला भेटली. तिने बचतगट चालवत असल्याची बतावणी करून आपन फ्रीज, वाहने, संसारोपयोगी महागड्या वस्तू बचतगट मार्फत देत आहोत असे सांगितले. त्यानंतर जून महिन्यात सुरेखा यांनी कस्तुरे यांची आरोपी गावंडेशी भेट घातली. त्यावेळी मीच हा गट चालवतो, तुम्ही निर्धास्त होऊन पैसे जमा करा असे त्याने सांगितले.
हेही वाचा- मराठा क्रांती मोर्चाची सरकार विरोधात पायी दिंडी यात्रा
त्यानंतर अंगणवाडी सेविका कस्तुरे यांनी १ लाख ७५ हजार रुपये ऑनलाईन प्रक्रियेद्वारे गावंडे यांच्या खात्यात जमा केले. त्यानंतर गावंडे यांनी कस्तुरे यांना एक पिठाची गिरणी घेऊन दिली व अजून वस्तू काही दिवसांनी देऊ, अशी थाप मारली. मात्र काही दिवसानंतर कस्तुरे यांनी सदरील लोकांना कॉल केला असता, त्यांचा फोन बंद येत होता. त्यांनी घरी जाऊन पाहिले असता, दरवाजा बंद होत. अनेक वेळा चकरा मारून देखील कोणीही भेटत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अशा प्रकारे फसवणूक झाल्याबाबत अनेकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.