औरंगाबाद - सोमवारी एकाच दिवशी कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. सायंकाळी आलेल्या अहवालात 30 नवीन रुग्णांना लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे रुग्णसंख्या 53 वरून थेट 83 वर गेली आहे.
टाऊन हॉल - नूर कॉलोनी 12, काळा दरवाजा - 1, किलेअर्क - 14, असेंफिया कॉलनी - 2, तर भीमनगर भावसिंगपुरा - 1 असे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. किलेअर्क भागातील एक वृद्ध रुग्णाचा सकाळी मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात 3 दिवसांमध्ये कोरोनाचे 40 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासन हादरले आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नूर कॉलनी आणि किलेअर्क परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केले आहे. रुग्ण आढळून आलेले परिसर लॉक करण्यात आले आहेत. 83 जणांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी 23 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी रुग्णसंख्या दुपटीने वाढल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे.