ETV Bharat / state

हर्सूल परिसरात २४ वर्षीय तरुणाने घेतला गळफास - हर्सूल पोलीस ठाणे लेटेस्ट

साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि.१६ रोजी हर्सूल परिसरात घडली आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहे.

२४ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या
२४ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या
author img

By

Published : Jun 18, 2021, 8:18 AM IST

औरंगाबाद - हर्सूल परिसरात २४ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि.१६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहे.

काही दिवसांपासून सुनील होता तणावात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील रामचंद्र गाडेकर वय २४ रा. जमन ज्योती कबीर गट हर्सूल असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सुनील हा चालक म्हणून काम करत होता. सहा सात महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. वर्षभरापासून त्याचे काम बंद होते. त्याची पत्नी महिनाभरापासून माहेरी गेली होती. गेल्या काही दिवसांपासून सुनील तणावात होता. त्याला दारूचे व्यसन देखील होते. दरम्यान बुधवारी (ता.१६) सायंकाळी सातच्या सुमारास सुनीलने घराच्या दुसऱ्या मजल्यावर साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.एस.जाधव करीत आहे.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतात साचले पाणी, कांद्यासह डाळिंबाच्या बागेचे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.