ETV Bharat / state

Coronavirus : औरंगाबादमध्ये 3 दिवस कडकडीत बंद, कोरोनाबाधितांचा आकडा 177 वर - कोरोना विषाणू

यामधून वैद्यकीय सेवेला सूट देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी दवाखाना आहे, त्या ठिकाणची औषधी दुकाने 24 तास सुरु असणार आहेत. तर बाजार पेठेत असलेली औषधी दुकाने दुपारी 2 पर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Aurangabad
औरंगाबादमध्ये 3 दिवस कडकडीत बंद
author img

By

Published : May 1, 2020, 3:34 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता खबरदारीचे उपाय म्हणून 3 दिवसांचा कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज (शुक्रवार) पासून पुढील 3 दिवस पूर्ण व्यापार शंभर टक्के बंद ठेवण्यात आला आहे.

औरंगाबादमध्ये 3 दिवस कडकडीत बंद

यामधून वैद्यकीय सेवेला सूट देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी दवाखाना आहे, त्या ठिकाणची औषधी दुकाने 24 तास सुरु असणार आहेत. तर बाजार पेठेत असलेली औषधी दुकाने दुपारी 2 पर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी आज पासून करण्यात आली आहे.

औरंगाबादेत गेल्या 4 दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. 4 दिवसांपूर्वी 53 रुग्णसंख्या असताना 4 दिवसांत ही रुग्णसंख्या 177 वर पोहचली आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट देखील वाढत असल्याने पुढील काही दिवस कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापारी महासंघाने 3 दिवस पूर्ण व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार औरंगाबादचा जुना आणि नवीन मोंढा भाग 3 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदमध्ये वैद्यकीय सेवेला सूट देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.