ETV Bharat / state

बियरसाठी झुंबड : जखमी कंटेनर चालकाला सोडून नागरिकांनी पळवले बियर बॉक्स

वैजापूर तालुक्यातील करंजगाव जवळ नागपूर - मुंबई महामार्गावर 25 जुलै रविवारी रात्री औरंगाबादहून - मुंबईकडे बियरचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकसोबत कंटेनर घासला होता. या अपघातात कंटेनरची एक बाजू घासली गेली आणि पत्रा फाटल्याने बियरचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. यावेळी येथील नागरिकांनी काही क्षणात कंटेनर रिकामा केला.

author img

By

Published : Jul 26, 2021, 11:21 AM IST

beer boxes steal in vaijapur, aurangabad
नागरिकांनी पळवले तब्बल 1650 बियर बॉक्स

औरंगाबाद - वैजापूर तालुक्यात बियर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अपघात झाला. पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच जमावाने बियरचे तब्बल 1650 बॉक्स लांबवल्याचा प्रकार समोर आला. यावेळी कोणीही अपघातग्रस्त कंटेनरच्या जखमी चालकाकडे लक्ष दिले नाही. मात्र त्याचवेळी तेथून जाणाऱ्या काही प्रवाशांनी संवेदनशीलता दाखवत जखमी कंटेनर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि घटनेची माहिती पोलिसांना कळविली.

नागरिकांनी पळवले तब्बल 1650 बियर बॉक्स

औरंगाबादहून मुंबईकडे जात होता कंटेनर -

औरंगाबादहून - मुंबईकडे बियरचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा 25 जुलैच्या (रविवार) रात्री वैजापूर तालुक्यातील करंजगाव जवळ अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकसोबत कंटेनर घासला होता. या अपघातात कंटेनरची एक बाजू घासली गेली आणि पत्रा फाटल्याने बियरचे बॉक्स रस्त्यावर पडले होते.

क्षणात रिकामा झाला कंटेनर -

अपघाताबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलीस येण्यापूर्वीच रस्त्यावर पडलेले बियरचे बॉक्स स्थानिक नाकरिकांनी पळवले. अपघातग्रस्त कंटेनरमधील बियरचे बॉक्स पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. कोणी डोक्यावर तर कोणी दुचाकीवर मावतली तेवढे बॉक्स घेऊन पळ काढतांना दिसत होते. कंटेनरमध्ये जवळपास 1800 बियरचे बॉक्स होते त्यापैकी 1650 बियर बॉक्स लोकांनी लांबवल्याचा समोर आले आहे. लोकांनी हातात बसतील तितके बॉक्स घेऊन पळ काढला. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात कंटेनर रिकामा झाल्याचे पाहायला मिळाले.

लुटमार करताना जखमी चालकाकडे दुर्लक्ष -

कंटेनरला अपघात झाल्याने चालक जखमी झाला होता. मात्र तिथे जमलेल्या लोकांनी चालकाकडे दुर्लक्ष करत बियर बॉक्स नेण्याला प्राधान्य दिले होते. कोणीही जखमी चालकाला रुग्णालयात नेले नाही. मात्र त्याचवेळी तिथून जाणाऱ्या श्रीमंत गोर्डे, रवींद्र मोकळे, सतीश मगर या नागरिकांनी चालकाला मदतीचा हात दिला. त्यांच्यावर प्रथमोपचार करत पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी वैजापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.