ETV Bharat / state

जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली; एकाच घरातील 7 जण जखमी - Udkhed school wall collapse news

ऊदखेड या गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवाराची भिंत कोसळून लगतच राहणाऱ्या कुरवाडे यांच्या घरावर पडली.

जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली; एकाच घरातील 7 जण जखमी

author img

By

Published : Jun 13, 2021, 10:12 PM IST

अमरावती - मोर्शी तालुक्यातील ऊदखेड या गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवाराची भिंत कोसळून लगतच राहणाऱ्या कुरवाडे यांच्या घरावर पडली. त्यामुळे गावात एकच हाहाकार उडाला. या घरातील सात व्यक्ती किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

ग्रामस्थांची घटनास्थळी धाव
गावातील नागरिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन दबलेल्या लोकांना बाहेर काढल्याने मोठा अनुचित प्रकार टळला. प्राप्त माहितीनुसार ऊदखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला बऱ्याच वर्षापासून कुरवाडे कुटुंब वास्तव्यास आहे. हे कुटुंब झोपेतच असताना अचानक दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्हा परिषद शाळेची शिकस्त असलेली भिंत कुरवाडे कुटुंबीयांच्या घरावर पडली. त्यामध्ये मंगेश लक्ष्मणराव कुरवाडे (31), गजानन लक्ष्मणराव कुरवाडे (34), आर्यन मंगेश कुरवाडे (6), सूर्यकांता मंगेश कुरवाडे (26), नर्मदा लक्ष्मणराव कुरवाडे (65), अंबिका गजानन कुरवाडे (30), साक्षी गजानन कुरवाडे (14), श्रेया गजानन कुरवाडे (12), सोनाली गजानन कुरवाडे ( 9) सर्व रा.उदखेड हे ढिगाऱ्याखाली खाली दबून किरकोळ जखमी झाले. त्यापैकी मंगेश लक्ष्मण कुरवाडे हा टीनाखाली दबल्या गेला होता. परंतु दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. लगेच गावातील मोहन अढाऊ, किशोर पाटील, मनोहर कुरवाडे यांनी जखमींना उपचारासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केला. मात्र नऊही रुग्णांना किरकोळ मार लागल्याने मोठा अनर्थ टळला.

पावसामुळे कोसळली भिंत
मागील काही दिवसापासून पावसाने मोर्शी तालुक्‍यात आगमन केले आहे. या पावसामुळे तालुक्यात असलेल्या ऊदखेड या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेली जुनी भिंत त्यांच्या घरावर पडली. याबाबत अधिक माहिती घेतली असता ऊदखेड येथील जिल्हा परिषद शाळेची भिंत शिकस्त झाली असून ती केव्हाही पडू शकते. अशी तक्रार कुरवाडे कुटुंबीयांनी वारंवार ग्रामपंचायतकडे केली होती.

आमदार भुयार यांनी केले सांत्वन
भिंत बांधणी विषयाची घटनेची माहिती मोहन अढाऊ यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना दूरध्वनीवरून दिली. मोर्शीचे प्रभारी तहसीलदार विठ्ठल वंजारी यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन जखमींची विचारपूस केली व त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.