ETV Bharat / state

Update Aadhaar Card : अन्यथा आपले आधार कार्ड होऊ शकते बंद

दहा वर्ष पूर्ण झालेल्या आधारकार्डधारकांनी त्यांचे आधारकार्ड अद्ययावत ( Update Aadhaar Card ) केले नसल्यास आधारकार्ड बंद ( Update Aadhaar Card Otherwise Closed ) होण्याची शक्यता आहे.

Update Aadhaar Card
Update Aadhaar Card
author img

By

Published : Dec 30, 2022, 9:14 PM IST

अमरावती : ज्या नागरिकांनी आपले आधारकार्ड दहा वर्षांपूर्वी काढले असतील त्यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल केले नसतील, अशा नागरिकांनी आधार कार्ड अद्यावयत ( Update Aadhaar Card ) करणे आवश्यक आहे. अन्याथा तुमचे आधार कार्ड बंद ( Update Aadhaar Card Otherwise Closed ) होऊ शकते. स्वतःसाठी किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यासाठी आधार नोंदणी ( Aadhaar Enrollment ) करण्यासाठी, तुम्हाला आधार नोंदणी केंद्राला ( Aadhaar Enrollment Centre ) भेट द्यावी लागेल.

बायोमेट्रिक तपशील अपडेट करण्याची गरज - जर तुमचा लोकसंख्येसंबंधी तपशील (नाव, पत्ता, डीओबी, लिंग, मोबाइल नंबर, ईमेल) तुमच्या आधारमध्ये अद्ययावत नसल्यास, तुम्ही आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन ते अपडेट मिळवू शकता. आधार धारक मुले (ज्यांची 15 वर्षे झाली आहेत) किंवा इतरांना बायोमेट्रिक तपशील अपडेट करण्याची गरज आहे - बोटांचे ठसे, डोळे, फोटो अद्यावयत करण्यासाठी नावनोंदणी केंद्राला भेट देणे आवश्यक आहे.

रहिवाशी पुरावा गरजेचा - आधार कार्ड अद्यावयत करण्यासाठी आपल्या ओळखपत्राचा पुरावा किंवा पत्त्याचा पुराव्यासह संबंधित मुळ कागदपत्रे घेऊन आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रे अपलोड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. ओळखपत्राचा नमुना, पत्त्याचा पुरावा संबंधित कागदपत्राची माहिती uidai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नविन आधार कार्ड काढण्याची सुविधा - प्रत्येक आधार केंद्रावर कागदपत्रांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. नागरिकांनी आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रे अपलोड करावी. वय वर्षे 18 असलेल्या नागरिकांचे नवीन आधारकार्ड काढावयाचे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने नेमून दिलेल्या आधार केंद्रावर ही सुविधा उपलब्ध आहे. ज्या नागरिकांचे आधारकार्ड बनलेले आहेत ते आपला मोबाईल क्रमांक, पत्ता, ठसे, नाव पूर्वीप्रमाणे अद्ययावत करु शकतात. नवीन बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम सर्व आधार केंद्रावर पूर्वीप्रमाणे सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.