ETV Bharat / state

World Meteorological Day 2023: जागतिक हवामान दिन; घर बसल्या 40 हजार शेतकऱ्यांना कळतो हवामानाचा अंदाज

आज जागतिक हवामान दिन आहे. अमरावती जिल्ह्यातील एकूण 40 हजार शेतकऱ्यांना आता शेतीच्या दृष्टीने नेमके वातावरण कसे राहील याबाबतचा अंदाज केवळ एका क्लिकवर मिळत आहे. यामध्ये पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज समजतो.

Meghdoot App
शेतकऱ्यांसाठी खास ॲप
author img

By

Published : Mar 23, 2023, 10:02 AM IST

घर बसल्या 40 हजार शेतकऱ्यांना कळतो हवामानाचा अंदाज

अमरावती: भारतीय शेती ही अनेक शतकांपासून हवामानाच्या अंदाजावर अवलंबून आहे. मात्र गत काही वर्षापासून हवामानाची अनिश्चितता देशातील शेती व्यवसायासाठी धोकादायक होत चालली आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी, चक्रीवादळे, अति थंडी, अति तापमान, गारपीट आणि दुष्काळ अशा विविध आपत्तींचा सामना करावा लागतो आहे. या सर्व घटकांचा पीक उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

40 हजार शेतकऱ्यांना फायदा: शेतीच्या दृष्टीने किमान तापमान कसे राहणार, कमाल तापमान काय असणार, सकाळची आणि दुपारची सापेक्ष आद्रता कशी असेल, वाऱ्याचा वेग कसा असेल? त्याची दिशा कोणती राहील, ढगांचे आच्छादन कसे असणार? एकूणच शेतीच्या दृष्टीने नेमके वातावरण कसे राहील याबाबतचा सलग पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज केवळ एका क्लिकवर एकूण 40 हजार शेतकऱ्यांना समजतो. जिल्हा हवामान विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ही संपूर्ण सुविधा करण्यात आली आहे. हवामानाचा नेमका अंदाज कळत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीवर येणाऱ्या संकटाबाबत आधीच माहिती मिळत आहे. यासोबतच शेतसमृद्ध करण्यासाठी नेमकी काय तयारी करावी याचा अंदाज देखील शेतकऱ्यांना येत आहे.

हवामान केंद्राचे महत्व: जिल्ह्यात 2020 पासून हवामान केंद्र बडनेरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दुर्गापूर येथे सुरू झाले आहे. या केंद्रावर हवामान विभागअंतर्गत नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज येतो. हा सल्ला दर मंगळवारी आणि शुक्रवारी शेतकऱ्यांना पाठविला जातो. शेतकरी खरीप हंगामापूर्वी नैऋत्य मोसमी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. हवामान अंदाजाचा उपयोग फक्त पेरणी करिता मर्यादित नसून ते पिकाची काढणी ते साठवणूक करण्यापर्यंत प्रत्येक कामात उपयुक्त असतो. शेत नांगरणी पासून शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत हवामानाचा अंदाज हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो. शेतकऱ्यांचे नुकसान कमी व्हावे यासाठी भारतीय हवामान विभाग ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेअंतर्गत सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे डॉ. सचिन मुंडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना जागृत ठेवण्याची भूमिका: शेतकऱ्यांचे पीक नुकसान होण्याचे प्रमाण कमी करणे हा मुख्य उद्देश हवामान विभागाचा आहे. दुर्गापुर कृषी विज्ञान केंद्र येथील हवामान विषय विशेषतज्ञ यांच्यासह, कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सातत्याने शेतकऱ्यांना केले जाते. हवामान विषयक तज्ञ आणि इतर कृषी विषय तज्ञाद्वारे गावपातळीवर शेतकरी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करून शेतकऱ्यांना कृषी व्यवस्थापनामध्ये हवामान अंदाज आजचे महत्व पटवून दिले जाते.

घरबसल्या हवामानाची माहिती: शेतकऱ्यांच्या शेतावर घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या समस्या विषयी थेट संवाद साधला जातो. शेतकरी जागरूकता कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईल फोन क्रमांकाची नोंदणी करून त्यांना संबंधित तालुक्यातील व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतले जाते. यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या हवामानाची माहिती व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कळते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांपर्यंत ही माहिती हवामान केंद्रातून पाठविली जाते.

इमेलद्वारे पत्रिकेचे वाटप: चाळीस हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना कृषी हवामान सल्ला पत्रिकेच्या फायदा होतो. प्रत्येक आठवड्याला शेतकऱ्यांकडून हवामान विषयक कृषी सल्ला पत्रिके संदर्भात प्रतिक्रिया देखील घेतल्या जातात. शेतकरी बांधवांकडून खरीप रब्बी व उन्हाळी हंगामातील हवामान विषयक यशोगाथा व त्या हंगामातील हवामानानुसार शेती करत असतानाचे प्रमुख फायदे याची माहिती हवामान केंद्राच्या वतीने दिली जाते. यासह कृषी विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, पशुसंवर्धन विभाग, आकाशवाणी केंद्र, वृत्तपत्र आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या विविध कृषी संबंधित सामाजिक संस्थांना देखील हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिका दर मंगळवारी आणि शुक्रवारी इमेलद्वारे पाठविली जाते.

हवामान अंदाज प्रकार व उपयोगिता: परिसरात 24 ते 48 तासांसाठी हवामानाचा नेमका अंदाज कसा राहील. तसेच उपयोगितेमुळे शेतकऱ्यांना शेतातील पिकांना ओडीत करावे की नाही हे ठरविण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. यासह शेती कामाचे व्यवस्थापन शेतकऱ्यांना करण्यास मदतीचे ठरते. पिकांवरील विविध रोगाकरिता औषधी फवारणी करण्यासाठी हवामान योग्य आहे की नाही? पिकांची कापणी व त्यांना सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवणे. काढणी केलेला भाजीपाला व फळे सुरक्षित बाजारपेठेत पाठविण्याकरिता देखील हवामानाचा अंदाज महत्त्वाचा ठरतो.

याहीसाठी होतो फायदा: पशु व पक्षांना सुरक्षित जागी ठेवण्याकरिता देखील हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. यासोबतच शेत पिकांवरील फवारणीचे प्रभावी नियोजन करणे, शेतमजुरांचे व्यवस्थापन, सिंचनाचे व्यवस्थापन, जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, परिपक्व अवस्थेत असलेल्या पिकांची कापणी करायची की नाही हे हवामानाच्या अंदाजावरच अवलंबून असते. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज काढावा तसेच हवामान अंदाजवर आधारित कृषी सल्ला आणि हवामानाचा पूर्वानुमान कळावे यासाठी शेतकऱ्यांना मेघदूत मोबाईल ॲपचा वापर करावा. तसेच मेघगर्जना व विजेच्या पूर्वानुमानाकरिता दामिनी ॲपचा वापर करण्याचे आवाहन डॉ. सचिन मुंडे यांनी केले आहे.

हेही वाचा: Jaitadehi ZP School जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी फुलवली बाग शाळेत टरबूजाची पार्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.