ETV Bharat / state

शासकीय विहिरीवर खासगी मालकी, गुरुदेवनगर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार - गुरुदेवनगर

महाराष्ट्र शासन नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत मौजा विचोरी सर्वे क्रमांक 132 मध्ये गुरुदेवनगर ग्रामपंचायतीला विहीर दिली होती. या विहिरीद्वारे 2002 ते 2009 पर्यंत गुरुकुंज मोझरी गावाची तहान भागविण्यात आली.

शासन योजनेतील विहीर ग्राम पंचायतने विकली!
author img

By

Published : May 15, 2019, 6:24 PM IST

अमरावती - तिवसा मतदारसंघातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर यांनी धुमाकूळ घातला आहे. यानंतर गुरुकुंज मोझरी गावासाठी गुरुदेवनगर पूरक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत वर्ष 2000-2001 मध्ये शासनाने गुरुकुंज मोझरी ग्रामपंचायतीला दिलेल्या विहिरीवर आज खासगी व्यक्तीची मालकी आहे. पाण्याने तुडुंब भरून असणारी शासन योजनेतील ही विहीर गुरुदेवनगर ग्रामपंचायतने विकली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शासन योजनेतील विहीर ग्राम पंचायतने विकली!

महाराष्ट्र शासन नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत मौजा विचोरी सर्वे क्रमांक 132 मध्ये गुरुदेवनगर ग्रामपंचायतीला विहीर दिली होती. या विहिरीद्वारे 2002 ते 2009 पर्यंत गुरुकुंज मोझरी गावाची तहान भागविण्यात आली. आता पाणी टंचाईची झळ संपूर्ण अमरावती जिल्ह्याला सोसावी लागत असताना आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळावे यासाठी अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. अप्पर वर्धा धरणावरून पाणी सोडण्यावरून साध्य जिल्ह्यात राजकारण होत असताना गुरुदेव नगर येथील पाण्याने तुडुंब भरलेला ग्रामपंचायतीची विहीर तळेगाव ठाकूर येथील रहिवासी नंदकीशोर रामलाल जयस्वाल यांच्या ताब्यात असल्याचे आणि ती जयस्वाल यांच्या नावावर असल्याचे लक्षात येताच शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य राहुल लांजेवार यांनी या प्रकाराबाबत आक्षेप घेतला.

या विहिरीबाबत जो काही पत्रव्यवहार झाला त्यानुसार तळेगाव ठाकूर येथील रहिवासी वीणा नंदकिशोर जयस्वाल आणि नंदकिशोर बाबाराव जयस्वाल यांनी 25 मे 2016 ला गुरुदेवनगर मोझरी ग्रामपंचायतचे सरपंच आणि सचिवांना पत्र देऊन विचोरी येथील सर्वे क्रमांक 132 मध्ये असणारी ग्रामपंचायतच्या मालकीची विहीर दोन वर्षांपासून बंद आहे . ही विहीर माझ्या शेतीसाठी वापरण्यास दिली तर शेतात पीक चांगले येईल आणि मी विहिरीची देखभाल पण करेल अशी विनंती केली होती.

गुरुदेवनगर ग्रामपंचायतीने जयस्वाल यांचा अर्ज मान्य करून त्यांना विहिरीतून पाणी काढण्याची परवानगी दिली होती. आता मात्र सदर विहीर ही पूर्णतः जयस्वाल यांच्या ताब्यात आहे. विहिरीलगतच्या मिटर स्टेशनमध्ये जयस्वाल यांनी सोकरी ठेवला आहे. गंभीर बाब म्हणजे या विहिरीची मालकीसुद्धा नंदकिशोर जयस्वाल यांच्या नावाने झाली असल्याचा आरोप राहुल लांजेवार यांनी केला आहे.

पाणी टंचाईने गुरुकुंज मोझरी आणि परिसरात हाहाकार उडाला असताना पाण्याने तुडुंब भरलेली शासन योजनेतील विहीर खासगी व्यक्तीकडे गेली कशी? याची चौकशी व्हावी अशी मागणी राहुल लांजेवार यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना केली.

Intro:तिवसा मतदारसंघातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर यांनी धुमाकूळ घातला असताना गुरुकुंज मोझरी गावासाठी गुरुदेवनगर पूरक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत 2000-2001 मध्ये शासनाने गुरुकुंज मोझरी ग्रामपंचायतीला दिलेल्या विहिरीवर आज खाजगी व्यक्तीची मालकी आहे. पाण्याने तुडुंब भरून असणारी शासन योजनेतील ही विहीर गुरुदेवनगर ग्रामपंचायतने विकली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Body:महाराष्ट्र शासन नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत मौजा विचोरी सर्वे क्रमांक 132 मध्ये गुरुदेव नगर ग्रामपंचायतीला विहीत दिली होती. या विहिरीद्वारे 2002 ते 2009 पर्यंत गुरुकुंज मोझरी गावाची तहान भागविण्यात आली. आता पाणी टंचाईची झळ संपूर्ण अमरावती जिल्ह्याला सोसावी लागत असताना आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदार संघातील दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळावे यासाठी अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. अप्पर वर्धा धरणावरून पाणी सोडण्यावरून साध्य जिल्ह्यात राजकारण होत असताना गुरुदेव नगर येथील पाण्याने तुडुंब भरलेला ग्रामपंचायतीची विहीर तळेगाव ठाकूर येथील रहिवासी नंदकीशोर रामलाल जयस्वाल यांच्या ताब्यात असल्याचे आणि ती जयस्वाल यांच्या नावावर असल्याचे लक्षात येताच शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य राहुल लांजेवार यांनी या प्रकारबाबत आक्षेप घेतला.
या विहिरीबाबत जो काही पत्रव्यवहार झाला त्यानुसार तळेगाव ठाकूर येथील रहिवासी वीणा नंदकिशोर जयस्वाल आणि नंदकिशोर बाबाराव जयस्वाल यांनी 25 मे 2016 रोजी गुरुदेवनगर मोझरी ग्रामपंचायतचे सरपंच आणि सचिवांना पत्र देऊन विचोरी येथील सर्वे क्रमांक 132 मध्ये असणारी ग्रामपंचायतच्या मालकीची विहिर दोन वर्षांपासून बंद आहे . ही विहीर माझ्या शेतीसाठी वापरण्यास दिली तर शेतात पीक चांगले येईल आणि मी विहिरीची देखभाल पण करेल असा अशी विनंती केली होती.
गुरुदेवनगर ग्रामपंचायतीने जयस्वाल यांचा अर्ज मान्य करून त्यांना विहीरितून पाणी काढण्याची परवानगी दिली होती. आता मात्र सदर विहीर ही पूर्णतः जैसावल यांच्या ताब्यात आहे. विहिरीलगतच्या मिटर स्टेशनमध्ये जयस्वाल यांनी सोकरी ठेवला आहे. गंभीर बाब म्हणजे या विहिरीची मालकी सुद्धा नंदकिशोर जयस्वाल यांच्या नावाने झाली असल्याचा आरोप राहुल लांजेवार यांनी केला आहे.
पाणी टंचाईने गुरुकुंज मोझरी आणि परिसरात हाहाकार उडाला असताना पाण्याने तुडुंब भरलेली शासन योजनेतील विहीर खासगी व्यक्तीकडे गेली काशी याची चौकशी व्हावी अशी मागणी राहुल लांजेवार यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना केली.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.