ETV Bharat / state

अमरावती : रस्त्यावरची गर्दी ओसरली; अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू - अमरावती शहर बातमी

वाढत्या कोरोनाच्या अनुषंगाने विकेंड लॉकडाऊन सुरू आहे. अमरावतीत दुपारनंतर गर्दी ओसरलेली दिसत होती.

रस्ता
रस्ता
author img

By

Published : Apr 10, 2021, 3:06 PM IST

Updated : Apr 10, 2021, 3:47 PM IST

अमरावती - कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत सरकारने राज्यभर विकेंड लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, दुपारच्या सुमारास रोजच्या तुलनेत गर्दी ओसरलेली दिसत होती.

अमरावती : रस्त्यावरची गर्दी ओसरली; अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू

अत्यावश्यक सेवा केंद्र सुरू

राज्य सरकारने सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने बंद ठेऊन केवळ अत्यावश्यक सेवेत मिळणारी औषधी, भाजीपाला, किराणा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने आजही सुरू दिसली. विकेंड लॉकडाऊनमध्येही सोमवार ते शुक्रवार जशी मार्केटचे चित्र राहते तसेच आजही कायम आहे. मात्र आज (दि.10 एप्रिल) बाजारात गर्दीचे प्रमाण कमी आहे.

बस स्थानकावर सकळी गर्दी, दुपारी शुकशुकाट

राज्य परिवहन मंडळाची बससेवा विकेंड लॉकडाऊनमध्येही सुरू आहे. आज अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावर सकळी प्रवाशांची गर्दी होती. दुपारी 12 नंतर मात्र मोचकेच प्रवासी बसस्थानकावर होते. मध्यवर्ती बस स्थानकावरून गाड्यांच्या फेऱ्याही कमी करण्यात आल्या आहे.

कोरोना रुगांच्या संख्येत वाढ

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यावर सर्वत्र खळबळ उडाली होती. 15 मार्चनंतर अमरावतीत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत होती. दरम्यान, राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातला असताना राज्य शासनाने कोरोनाची चेन ब्रेक करणयासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भाजप आणि काँग्रेसने अमरावतीत या बंदची गरज नसल्याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. भाजप कार्यकर्त्यांनी तर शुक्रवारी शटर उघडा आंदोलन केले. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यात 425 रुग्ण आढळून आल्याने आणि लगतच्या नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे एकाच दिवशी 75 जनांचा मृत्यू झाल्याने अमरावतीकरही हादरले आहे.

हेही वाचा - अमरावतीत कोरोना लसीचा तुटवडा, जिल्ह्यात 25 पेक्षा जास्त लसीकरण केंद्र बंद

Last Updated : Apr 10, 2021, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.