ETV Bharat / state

Melghat Water Crisis : मेळघाटातील नागरीक गढूळ पाण्याने त्रस्त; खासदार मात्र हनुमान चालिसा म्हणण्यात व्यस्त - महाराष्ट्र पाणी टंचाई

मेळघाटात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ( Melghat Water Crisis ) अतिशय गंभीर होत आहे. चिखलदाऱ्यातील रहिवाशांना सुद्धा पाणी टंचाईची ( Water Scarcity In Melghat ) झळ सोसावी लागत आहे. लगतच्या अनेक गावांमधील आदिवासी महिलांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असताना कोणताही लोकप्रतिनीधी ( Public Representative Ignore Melghat Water Issue ) या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही. मेळघाटात पिण्याच्या पाण्याची इतकी भीषण परिस्थिती असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) मात्र हनुमान चालिसा म्हणण्यात ( Hanuman Chalisa Controversy ) व्यस्त आहे.

Melghat Water Crisis
Melghat Water Crisis
author img

By

Published : May 18, 2022, 4:25 PM IST

Updated : May 18, 2022, 5:05 PM IST

अमरावती - मेळघाटात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ( Melghat Water Crisis ) अतिशय गंभीर होत आहे. चिखलदाऱ्यातील रहिवाशांना सुद्धा पाणी टंचाईची ( Water Scarcity In Melghat ) झळ सोसावी लागत आहे. लगतच्या अनेक गावांमधील आदिवासी महिलांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असताना कोणताही लोकप्रतिनीधी ( Public Representative Ignore Melghat Water Issue ) या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही. गंभीर बाब म्हणजे येथील नागरिकांना गढूळ पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे. मेळघाटात पिण्याच्या पाण्याची इतकी भीषण परिस्थिती असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) मात्र हनुमान चालिसा म्हणण्यात ( Hanuman Chalisa Controversy ) व्यस्त आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना मेळघाट फक्त निवडणुकीलाच आठवतो का? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया

चिमुकल्या, तरुणी, वृद्ध महिला सर्वच विहिरीवर - चिखलदरा आणि लगतच्या परिसरातील तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. या ठिकाणी परतवाडा येथून टँकरद्वारे पाणी आणण्याची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने केली आहे. चिखलदरासह लगतच्या चार ते पाच गावांमध्ये टँकर येतो. एकूण 11 टँकर पैकी तीन ते चार टँकर हे लगेच या गावातील विहिरीमध्ये पाणी टाकतात. टँकरचे पाणी विहिरीत सोडल्या बरोबरच गावातील चिमुकल्या मुली, तरुणी, वृद्ध महिला सर्वच दोर बकेट आणि गुंड घेऊन विहिरीवर गर्दी करतात. कधी सकाळच्या वेळेस टँकरने विहिरीत पाणी सोडले तेव्हा सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत विहिरीवर गर्दी पाहायला मिळते. तर कधी दुपारी 4 वाजता टँकर आला की सायंकाळी 7 वाजेपर्यंत गाव ते विहीर अशी पाण्यासाठी महिलांची जत्रा पाहायला मिळते. पाण्यासाठी सर्व त्रास महिलांना सहन करावा लागतो. पुरुष मंडळी विहिरीपर्यंत येत नाही, असे दुःखही अनेक महिलांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले. एका महिलेच्या डोक्यावर तीन ते चार पाण्याचे हंडे वाहून नेताना चे चित्र चिखलदरा सहल लगतच्या मोठा गावातही पहायला मिळते आहे.

गढूळ पाण्याने आजारही वाढले - टँकर येईल हे काही सांगता येत नाही. यामुळे अनेकदा विहिरीत साचलेल्या गढूळ डबक्यातील पाणीच आम्हाला मिळते. हे खराब पाणी आम्ही शक्यतोवर इतर कामांसाठी वापरत असलो, तरी जेव्हा पिण्यासाठी पाणीच मिळणे कठीण होऊन जाते, त्यावेळी हेच पाणी अनेकदा गाळून पिणे हात एकमेव पर्याय आमच्या समोर आहे. खराब पाणी पिल्यामुळे गावात अनेकांना खोकला, पोट दुखी, असे अनेक आजार जडले असल्याच्या तक्रारी देखील चिखलदरासह इतर गावातील महिलांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली आहे.

लोकप्रतिनिधी, प्रशासन कोणीही गंभीर नाही - मेळघाटातील पाण्याच्या भीषण समस्येबाबत जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा, पालकमंत्री यशोमती ठाकूर, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे कोणीही विशेष असे लक्ष देत नाही, अशीच परिस्थिती मेळघाटातील आहे. मेळघाटातील अनेक गावांमधील आदिवासी बांधवांना आपली ही महत्त्वाची गरज खासदार किंवा पालकमंत्री आणि आमदार सोडवू शकतात. याची सुद्धा माहिती नसल्याची धक्कादायक बाब आदिवासी बांधवांशी बोलताना समोर आली आहे. पावसाळ्यात सर्वच आलबेल होईल, असे गृहीत धरून राजकारणात एकमेकांना पाणी पाजण्यासाठी आतूर असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मेळघाटातील आदिवासींना भर उन्हाळ्यातही पिण्यासाठी योग्य पाणी मिळते की नाही, याकडे लक्ष द्यावेसे वाटत नाही, हेच गंभीर वास्तव आहे.

हेही वाचा - Indrani Mukherjee : कोण आहेत इंद्राणी मुखर्जी? ज्यांच्यावर शीना बोराच्या हत्येचा आहे आरोप

Last Updated : May 18, 2022, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.