ETV Bharat / state

शंभर टक्के कर भरा अन् जिंका लाखोंची बक्षिसे, 'या' ग्रामपंचायतीची अनोखी योजना - अमरावती जिल्हा बातमी

गावातील विकास कामे करण्यासाठी निधीची गरज असते. मात्र, अनेक ग्रामपंचायतीमध्ये नागरिक कर न भरल्यामुळे निधीची कमतरता जाणवते परिणामी गावचा विकास थांबतो. मात्र, ग्राम विकासासाठी निधी गोळा व्हावा यासाठी शंभर टक्के कर भरणा करणाऱ्यांना लकी ड्रॉमार्फत आकर्षक बक्षिसे देण्याची योजना अमरावती जिल्ह्यातील वेरुळ रोंघे (ता. धामणगाव रेल्वे) या ग्रामपंचायतीने घेतला आहे. यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद असून या योजनेची सोडत 29 एप्रिलला होणार आहे.

edited photo
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 24, 2021, 5:32 PM IST

Updated : Mar 24, 2021, 9:41 PM IST

अमरावती - नागरिकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी विविध योजना ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेकडून करण्यात येते. अमरावती जिल्ह्याच्या वेरुळ रोंघे (ता. धामणगाव रेल्वे) ग्रामपंचायतीने शंभर टक्के घरपट्टी, पाणीपट्टी भरणाऱ्यांच्या नावे लकी ड्रॉ योजने समाविष्ट करणार आहेत. लकी ड्रॉमधून आलेल्या नागरिकांना विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामुळे या ग्रामपंचायतीतील नागरिकांचा कर भरण्याकडे कल वाढला आहे.

शंभर टक्के कर भरा अन् जिंका लाखोंची बक्षिसे, 'या' ग्रामपंचायतीची अनोखी योजना

ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य व सरपंच यांनी गावाचा विकास करून गाव आदर्श मॉडेल करण्याचा निश्चय केला. पण, गाव आदर्श करायचे झाल्यास निधीची गरज असते व निधी उपलब्ध नसल्याने गावाचा विकास कसा होणार, असा प्रश्न या लोकांसमोर होता. जर लोकांनी 100 टक्के कर भरला तर गावाचा विकास होऊ शकतो असे येथील नवनिर्वाचित सरपंच रुपेश गुल्हाने यांना वाटले.परंतु लोक घरपट्टी पाणीपट्टी भरत नसल्याने आठ लाख रुपये या गावातील लोकांकडे थकीत आहे. पण, लोकांकडून कर वसुली करायची झाल्यास लकी ड्रॉ पद्धत राबविल्यास नागरीक 100 टक्के कर भरतील, असे येथील ग्रामपंचायतीला वाटले. त्यानंतर त्यांनी शंभर टक्के कर भरा आणि लाखोंची बक्षिसे जिंका ही योजना सुरू केली आहे. या योजने सर्वानुमते मंजूरी मिळाल्यानंतर ग्रामसेवकानेही या योजनेस संमती दिली. त्यामुळे आता आपल्यालाही बक्षीस लागेल या आशेवर गावातील नागरिकांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे. करवसुलीसाठी लकी ड्रॉ पद्धत राबवणारी ही विदर्भातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे बोलले जाते.

अशी केली लाखोंच्या बक्षिसांची तरतूद

लकी ड्रॉमध्ये देण्यात येणाऱ्या बक्षिसांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्याला हजारो रुपये लागणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद ही ग्रामपंचायत करू शकत नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतच्या सरपंच, सचिव व सदस्यांनी स्वतः या योजनेतील बक्षिसाचे नियोजन केले आहे.

घरोघरी जाऊन दिली जाते लकी ड्रॉची माहिती

करवसुलीसाठी सुरू केलेल्या या लकी ड्रॉ मोहिमेची माहिती गावातील नागरिकांना ग्रामपंचायतीकडून घरोघरी जाऊन दिली जाते. त्यासाठी गावचे सरपंच सचिव व सदस्य हे लोकांच्या घरोघरी जाऊन लकी ड्रॉची माहिती देऊन त्यांना कर भरण्यासाठी सांगितले जाते.

लकी ड्रॉमध्ये असणार 'ही' बक्षिसे

पहिले बक्षीस फ्रिज, दुसरे बक्षीस एलईडी टीव्ही, तिसरे बक्षीस कुलर, चौथे बक्षीस ड्रेसिंग टेबल, पाचवे बक्षीस गॅस गिझर, सहावे बक्षीस स्टॅन्ड फॅन, सातवे बक्षीस मिक्सर, आठवे होम थिएटर, नववे बक्षीस कुकर, दहावे बक्षीस इस्त्री देण्यात येणार आहे. या लकी ड्रॉची सोडत 29 एप्रिलला होणार आहे.

हेही वाचा - अंजनगाव सुर्जी येथे वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यास मारहाण

हेही वाचा - अमरावती : एसटी महामंडळातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थितीचे आदेश

Last Updated : Mar 24, 2021, 9:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.