अमरावती - रेशनचे धान्य मिळविण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंब धडपड करीत असताना मेळघाटात मात्र रेशन दुकानदार धान्य न्या हो, अशी विनवणी ग्रामस्थांना करत आहे. ग्रामस्थांनी आपल्या हक्काच्या धान्याकडे पाठ फिरविल्याचे विदारक ( Melghat People Ignore Ration Shop ) चित्र भवई गावाचे आहे. 'ईटीव्ही भारता'ने या प्रकारच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला असता खिशात पैसाच नसल्यामुळे ग्रामस्थ रेशन धान्यदुकानाकडे ( Melghat People Not Purchasing Ration ) फिरकत नसल्याचे वास्तव समोर आले.
असे होते धन्य वितरण -
भवई या गावाची लोकसंख्या 390च्या आसपास आहे. एकूण 74 कुटुंब या गावात राहत असून रेशन दुकानात दोन महिन्यासाठी 12 क्विंटल गहू, 9 क्विंटल तांदूळ आणि 74 क्विंटल साखर आली आहे. एका कुटुंबाला 3 रुपये दराने 15 किलो गहू, 2 रुपये दराने 10 किलो तांदूळ आणि 15 रुपये किलोप्रमाणे एक किलो साखर वितरीत केली जाते. 8 जानेवारीपासून या महिन्याच्या धान्य वितरणाला सुरुवात झाली असून गावातील केवळ 4 ते 5 कुटुंबांनीच धान्य खरेदी केले असल्याची माहिती भोगीलाल बेठेकर या रेशन दुकान मालकाने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हाती पैसा आल्यावर घेणार धान्य -
ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचे धन्य हवे आहे. मात्र, हातात पैसा आल्याशिवाय कुणी धान्य घेत नाही. गावातील मंडळी आता रोजगार हमी योजनेच्या कामगार गेली आहेत. कामावरून पैसे मिळाल्यावर ते धान्य खरेदी करतील, असे किशोर बेठे हे ग्रामस्थ 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
हेही वाचा - Melghat Fog : अमरावतीत झालेल्या अवकाळी पावसाने मेळघाटात धुक्याची चादर; पर्यटकांची मोठी गर्दी