ETV Bharat / state

अमरावती : मुख्यमंत्र्यांच्या सामाजिक ग्राम परिवर्तन योजनेने पालटले शेंदोळा गावाचे चित्र - Village Social Transforming Mission news amravati

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उदयास आलेल्या ग्राम सामाजिक विकास परिवर्तन योजनेअंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यातील प्रायोजिक तत्वावर 1 हजार गावे दत्तक घेण्यात आली होती. यात अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि तिवसा तालुक्यातील एकूण 12 गावांचा समावेश करण्यात आला आहे.

तिवसा तालुक्यातील आदर्श गाव शेंदोळा खुर्द
author img

By

Published : Sep 15, 2019, 2:18 PM IST

Updated : Sep 16, 2019, 6:18 PM IST

अमरावती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेल्या ग्राम सामाजिक विकास परिवर्तन योजनेअंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यातील प्रायोगिक तत्वावर 1 हजार गावे दत्तक घेण्यात आली होती. यात जिल्ह्यातील धारणी आणि तिवसा तालुक्यातील एकूण 12 गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तिवसा तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या शेंदोळा खुर्द या गावाचा समावेश आहे.

तिवसा तालुक्यातील आदर्श गाव शेंदोळा खुर्द

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहलेल्या सामाजिक ग्राम विकास परिवर्तन योजनेत पहिल्या टप्यात जिल्ह्यातील तिवसा तालुक्याच्या आदर्श ग्राम शेंदोळा खुर्दचा समावेश करण्यात आला. खेड्यांचा विकास हे ध्येय समोर ठेऊन सुरू केलेल्या अभियानामुळे शेंदोळा गावाचा कायापालट झाला आहे.

हेही वाचा - अमरावतीच्या तिवसा येथे अतिसाराची लागण; ग्रामीण रुग्णालय हाऊसफुल!

गावात कधीकाळी नळाला दूषित पाणी येत असल्याने येथील नागरिकांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं असे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत ने 5 रुपयात 20 लिटर थंड व शुद्ध पाणी देण्याची सोय सुरू केली. सोबतच जे कुटुंब वर्षभराचा पाणी पट्टी व घर कर भरेल त्याला रोज 20 लिटर पाणी व ग्रामपंचायतच्या पिठगिरणीतून मोफत दळण दळून दिले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतचे उत्पन्न देखील वाढले आहे. तसेच शौचालय, चौकात व घरासमोर कचरा कुंडी,नाल्याचे बांधकाम करण्यात आले. गावात ठिकठिकाणी संदेश देणारे सुविचार, म्हणी लिहिण्यात आल्या आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे.

amravati
तिवसा तालुक्यातील आदर्श गाव शेंदोळा खुर्द

तरुणांच्या सुदृढ व निरोगी शरीरासाठी व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी डिजिटल लायब्ररीही उघडण्यात आली आहे. तसेच अंगणवाडीत देखील विविध उपक्रमात्मक बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत शेंदोळा खुर्द येथे 2 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून महाराष्ट्रातील 1 हजार गावांपैकी 30 गावे आता या स्पर्धेत आहे.

हेही वाचा - विधानसभेत आमदार रवी राणांचे डिपॉझिट जप्त होणार- नगरसेवक तुषार भारतीय

Intro:मुख्यमंत्र्यांच्या सामजिक ग्राम परिवर्तन विकास योजनेने अमरावतीच्या शेंदोळा गावाचे चित्र पालटले.

दळण,शुद्ध पाणी मोफत,अनेक योजना गावात कार्यरत
--------------------------------------------
मुख्यमंत्री दत्तक गाव स्पेशल स्टोरी
मनोज सरांना विचारून वापरावी 

स्पेशल स्टोरी 
-------------------------------------------------------
 अमरावती अँकर
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गावाच्या सर्वांगीक विकासासाठी उदयास आलेल्या ग्राम सामजिक विकास परिवर्तन योजने अंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यात प्रायोजिक तत्वावर एक हजार गावे दत्तक घेण्यात आली होती.अमरावती जिल्ह्यातील  धारणी आणि तिवसा तालुक्यातील एकूण बारा गावाचा समावेश करण्यात आला आहे.यातील तिवसा तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या शेंदोळा खुर्द या गावाचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावाची काय परिस्थिती आहे पाहूया etv भारतच्या या स्पेशल रिपोर्ट च्या माध्यमातून....

Vo-1
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून उभ्या राहलेल्या सामजिक ग्राम विकास परिवर्तन योजनेत पहिल्या टप्यात अमरावतीच्या जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आदर्श ग्राम शेंदोळा खुर्द चा समावेश करण्यात आला. खेड्याचा विकास हे ध्येय समोर ठेऊन सुरू केलेल्या अभियाना मुळे गावात मोठा कायापालट झाला.

बाईट-1 - शरद वानखडे-सरपंच-(पांढरे शर्ट)

Vo-2
गावात कधीकाळी नळाला दूषित पाणी येत असल्याने अनेक आजारांना येथील नागरिकांना सामोरं जावं लागतं असे .त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत ने पाच रुपयात 20 लिटर थंड व शुद्ध पाणी देण्याची सोय सुरू केली सोबतच जे कुटुंब वर्षभराचा पाणी पट्टी व घर कर भरेल त्याला रोज 20 लिटर पाणी व ग्रामपंचायत च्या पिठगिरणीतून मोफत दळण दळून दिल्या जाते. त्यामुळे ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढले आहे.

बाईट-2.-संगीता निघोट -ग्रामस्थ(पिवळी साडी)

Vo-3
या ग्राम परिवर्तन विकास योजनेतून गावात ठिकठिकाणी cctv कॅमेरे, पेंविंग ब्लॉक,पथदिवे ,गरजू कुटुंबाना 
शौचालय, चौकात व घरासमोर कचरा कुंडी,नाल्याचे बांधकाम करण्यात आले.गावात ठिकठिकाणी संदेश देणारे सुविचार,म्हनी लावण्यात आल्या आहे.तसेच महिला सक्षमी करनासाठी  बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे.परन्तु व्यवसायाला कर्ज उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी महिला करतात.

बाईट-3-ललिता आडीकने-ग्रामस्थ

Vo-4
तरुणांच्या सुदृढ व निरोगी शरीरासाठी व्यायामशाळा ,जिम ची उभारणी करण्यात आली.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी डिजिटल लायब्ररी ही उघडण्यात आली मग एवढं सार होत असताना. अंगणवाडीत किलबिलाट करत शिकणाऱ्या चिमुकल्याची शाळा तरी कशी मागे राहील.

बाईट-4-वैशाली ठाकरे-अंगणवाडी सेविका (गुलाबी साडी)

Vo-5
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेत असलेल्या आदर्श गावाकडे वाटचाल सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

बाईट-5-गुणवंत उमप-तंटामुक्ती अध्यक्ष(भगवी टोपी)

Vo-6
आतापर्यंत या गावात दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.महाराष्ट्र मधील एक हजार गावांपैकी 30 गावे आता या स्पर्धेत आहे.भविष्यात गावात शेतकऱ्यांन साठी गोडावून उभारण्याचे प्रयत्न सूरु असल्याचे ग्राम परिवर्तक पूजा खडसे यांनी सांगितले.

बाईट-6-पूजा खडसे ग्राम परिवर्तक (चष्मा लावलेली मुलगी)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानाला गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्यामुळेंच आज गावच रूप पालटले आहे

स्वप्नील उमप एटीव्ही भारत अमरावतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Sep 16, 2019, 6:18 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.