अमरावती : गुरुवारी सोशल मीडियावर दोन युवक हातात बंदूक घेऊन भर रस्त्याने फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत ( Two Youngster Walk With Gun In Amravati ) होता. हा व्हिडिओ दर्यापूर शहरातील आठवडी बाजार परिसरातील असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे या व्हिडिओचा शोध घेत ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण परिसर व सीसीटीव्ही कॅमेरे शोधून काढले. यात दोन युवकांचा पोलिसांना शोध लागला असून त्यांच्या हातात बंदूक नव्हे तर मेणबत्ती पेटवण्याचे लाईटर असल्याचे तपासात निष्पन्न झाले ( Candle Lighter Gun ) आहे.
मेणबत्ती पेटवण्याचे लाईटर : विशाल भोलानाथ तांडेकर, रा. बनोसा व सुरज पुरुषोत्तम वाघमारे रा. दर्यापूर, अशी ताब्यात घेण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. त्यांच्याजवळ मेणबत्ती पेटविण्याचे लाईटर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मात्र काहीकाळ व्हिडीओ व्हायरल झाला ( Youngster With Gun Video Gone Viral ) होता.
व्हायरल व्हिडिओने माजवली खळबळ : गुरुवारी सकाळपासून दर्यापूर शहराच्या बाजारपेठेतील प्रमुख मार्गाने दोन युवक हातात बंदूक घेऊन जाताना दिसत होते. असा व्हिडिओ दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या व्हिडिओने ग्रामीण पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलने या प्रकरणाचा शोध घेतला असता त्या दोन्ही युवकांच्या हातातील ती बंदूक नव्हे तर मेनबत्ती पेटवण्याचे लाइटर असल्याचे निष्पन्न झाले. तसेच पोलिसांना या युवकांचा शोध लागला असून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी भर वस्तीमध्ये शस्त्र किंवा त्यासारखे वस्तू घेऊन लोकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न कुणी करत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.