अमरावती - मेळघाट हा अशिक्षित आणि अतिदुर्गम भाग समजला जातो. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने येथील आदिवासी लोकांमध्ये अशिक्षितपणा दिसून येतो. कोरोना काळात तर मेळघाटातील आदिवासी नागरिकांनी लसीकरणाला पाठ फिरविल्याच चित्र आहे. मेळघाटातील जास्तीत नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, या करिता त्याच्या कोरकू भाषेत जनजागृती करण्यात येत आहे. या सर्व बाबींना अपवाद ठरले ते म्हणजे चिखलदरा तालुक्यातील चीचखेडा गाव. येथे ४५ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
अफवांना बळी न पडता लसीकरण केले -
६०४ लोकसंख्या असलेल चीचखेडा या गावात ४५ वर्षावरील १३६ स्त्री पुरुष राहतात. या सर्वांनी अफवांना बळी न पडता स्वतःचं लसीकरण करून घेतले आहे. त्यामुळे ४५ वर्षावरील लसीकरण करणार चीचखेडा हे गाव जिल्ह्यात पहिले गाव ठरले आहे. या करिता येथील तलाठी व पोलीस पाटीलसह सर्व प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून लसीकरण करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन केले आहे. सद्या १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविले आहे. शासनाच्या आदेशानुसार लसीकरण सुरू झाल्यास चीचखेडा गावातील १८ ते ४५ वयोगटातील सर्वांचे लसीकरण होणारे गाव ठरणार, असा मानसदेखील गावकऱ्यांनी ठरविला आहे.
हेही वाचा - नाशिक - भाजपा नगरसेविकेच्या पतीचा राडा, थेट रूग्णालयात इनोव्हा कार घुसवून तोडफोड