ETV Bharat / state

Leopard died : दोन बिबट्याचा तलावाजवळ मृत्यू; सर्पदंशामुळे दगावल्याचा संशय

author img

By

Published : Dec 7, 2022, 1:28 PM IST

Updated : Dec 7, 2022, 2:12 PM IST

सेमाडोह रायपुर मार्गावर एका तलावाजवळ दोन बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ ( Two leopards were found dead ) उडाली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या तलावाजवळ एक बिबट्या बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला त्याची तपासणी केली असता तो दगावल्याचे वन कर्मचाऱ्यांना आढळून आले.

Leopard died
बिबट्याचा तलावाजवळ मृत्यू

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ( Melghat Tiger Reserve ) सिपला वन्यजीव विभागात ( Sipla Wildlife Department ) सेमाडोह रायपुर मार्गावर एका तलावाजवळ दोन बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ ( Two leopards were found dead ) उडाली आहे. मृतावस्थेतेतील एक बिबट्या चार वर्षाचा आणि दुसरा दीड वर्षाचा आहे.

असेरी वनखंडात आढळले मृत बिबट : सीमाडोह रायपूर मार्गावर आत मध्ये असणाऱ्या असेरी वनखंड क्रमांक 161 मध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या तलावाजवळ एक बिबट्या बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला त्याची तपासणी केली असता तो दगावल्याचे वन कर्मचाऱ्यांना आढळून आले. तेथून काही अंतरावरच दीड वर्षीय मादी बिबट्यादेखील मृत अवस्थेत आढळून आली.

शवविच्छेदन अहवालात होणार मृत्यूचे कारण स्पष्ट : जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळतात शिपना वन्यजीव विभागाच्या वनसंरक्षक दिव्या भारती सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम हे असेही वन खंड परिसरात पोहोचले. दरम्यान दोन्ही मृत बिबट्या अंगावर कुठलाही प्रकारच्या जखमीचे निशाण आढळून आले नाही. पशुवैद्यकीय अधिकारी वैभव हागवणे आणि सीआर धनगर यांनी दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन केले. नंतर ज्या ठिकाणी हे बिबट्या आढळून आले. त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्पदंशामुळे हे बिबट्या दगावले असू शकतात अशी चर्चा परिसरात आहे. तर या दोन्ही बिबट्याला विश देण्यात आल्याचेही बोलले जात आहे. मात्र हे दोन्ही बिबट्या नेमके कशामुळे दगावले हे शव विच्छेदन अहवाल समोर आल्यावरच स्पष्ट होईल.

Last Updated : Dec 7, 2022, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.