ETV Bharat / state

अमरावती-नागपूर महामार्गावर टोमॅटोने भरलेला ट्रक उलटला; लाखो रुपयांचे नुकसान - amravati nagpur highway news

नाशिकवरून बांगलादेशकडे ९०० कॅरेट टोमॅटो घेऊन जात होता. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ६वर नांदगावपेठजवळील बिजीलँडसमोर एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा ट्रक महामार्गावरील डिव्हायडरवर चढून उलटला.

टोमॅटोने भरलेला ट्रक पलटी
टोमॅटोने भरलेला ट्रक पलटी
author img

By

Published : Sep 20, 2020, 12:17 PM IST

अमरावती - दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात टोमॅटोने भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर आज (रविवार) सकाळी ८ वाजता नांदगाव पेठजवळ ही घटना घडली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी, लाखो रुपयांचे टोमॅटो रस्त्यावर पडले होते.

आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास एक ट्रक नाशिकवरून बांगलादेशकडे ९०० कॅरेट टोमॅटो घेऊन जात होता. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ६वर नांदगावपेठजवळील बिजीलँड कापड मार्केटसमोर एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा ट्रक महामार्गावरील डिव्हायडरवर चढला व पलटी झाला. यामुळे, महामार्गावर ट्रकमधील लाखों रुपयांच्या टोमॅटोचा सडा पडला होता. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.

हेही वाचा - मेळघाटातील ३० सागवान झाडे लंपास करणारे अद्यापही फरारच, वनविभागाची सारवासारव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.