ETV Bharat / state

Melghat Tourism : मेळघाटात पर्यटन झाले धोक्याचे; पर्यटकांची व्याघ्र प्रकल्पाच्या कारभारावर नाराजी - Wildlife lovers flock to Melghat in large numbers

वन्यजीव प्रेमी मोठ्या संख्येने मेळघाटात ( Wildlife lovers flock to Melghat in large numbers ) जंगल सफारीसाठी येत असताना त्यांना योग्य अशा सुविधा पुरविण्यास वन्यजीव विभाग अपयशी ठरतो आहे. पर्यटकांसाठी कुठल्याही विशेष अशा सुविधा नसल्यामुळे मेळघाटात वन्यजीव विभागाने आकारलेले शुल्क भरून सुद्धा पर्यटकांना कुठल्याही सुविधा मिळत नसल्याने मेघाटात फिरणे धोक्याचे (Walking in Meghat is dangerous ) झाले असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो आहे.

Melghat Tourism
मेळघाटात पर्यटन झाले धोक्याचे
author img

By

Published : Nov 16, 2022, 12:51 PM IST

अमरावती : देशातील नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या मेळघाटात पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक पर्यटन स्थळ आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने पर्यटकांना आकर्षित करण्यास विशेष असे प्रयत्न होत नसले तरी वन्यजीव प्रेमी मोठ्या संख्येने मेळघाटात ( Wildlife lovers flock to Melghat in large numbers ) जंगल सफारीसाठी येत असताना त्यांना योग्य अशा सुविधा पुरविण्यास वन्यजीव विभाग अपयशी ठरतो आहे. पर्यटकांसाठी कुठल्याही विशेष अशा सुविधा नसल्यामुळे मेळघाटात वन्यजीव विभागाने आकारलेले शुल्क भरून सुद्धा पर्यटकांना कुठल्याही सुविधा मिळत नसल्याने मेघाटात फिरणे धोक्याचे (Walking in Meghat is dangerous ) झाले असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो आहे.

मेळघाटात पर्यटन झाले धोक्याचे

जंगल सफारी झाली धोकादायक : 1571.74 चौरस किलोमीटर पर्यंत पसरलेल्या मेळघाटात पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक स्थळ आहेत. यापैकी चिखलदरा, नरनाळा, सेमाडोह आणि कोलकास या चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या पर्यटन स्थळांवर पोहोचण्यासाठी शुल्क आकारले जाते. यासोबतच या ठिकाणी राहण्याच्या व्यवस्थेसाठी अतिरिक्त शुल्क तसेच पर्यटनासाठी देखील शुल्क घेतले जाते. जंगलाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक देखील हे शुल्क आकारण्याची तयारी ठेवतात. मात्र पर्यटनाची संपूर्ण व्यवस्था ही वन्यजीव विभागाने खाजगी व्यक्तींवर सोपविल्यामुळे पर्यटकांना पर्यटनाचा आनंद मिळेल याची कुठलीही शाश्वती नाही. खाजगी व्यक्तींसोबत जंगलात फिरतांना कुठले संकट ओढावले तर हे कंत्राटी खाजगी माणसं ही आमची जबाबदारी नाही असे म्हणत पर्यटकांना कुठलीही मदत करीत नसल्यामुळे पुन्हा मेळघाटात न आलेलेच बरे दुर्दैवाने असा विचार अनेक पर्यटकांना करावा लागतो.

जिप्सी बाबत अनेक तक्रारी : मेळघाटातील पर्यटन स्थळांवर फिरण्यासाठी वन्यजीव विभागाच्या वतीने कंत्राटी पद्धतीने खाजगी व्यक्तींकडून खुल्या जिप्सीची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिशय निकृष्ट दर्जाच्या असणाऱ्या ह्या जिप्सी चिखलदऱ्यातील पर्यटन स्थळांसह जंगल सफारी तसेच सेमाडोह कोलकास येथील दंगल सफारीसह नरनाळा किल्ला आणि नरनाळा परिसरातील अभयारण्य पर्यटकांना फिरविण्यासाठी वापरल्या जातात. दिवसाला दोन-तीन पर्यटकांना तरी या जिप्सी मधातच बंद पडल्यामुळे होणाऱ्या त्रासाचा सामना करावा लागतो. यापैकी अनेक गाड्यांचे आयुष्य संपल्यात जमा असताना देखील जंगलातील खडतर वाटेवर त्या पर्यटकांना घेऊन धावत आहेत या गाड्यांचे कधी टायर फुटतो कधी पंचर होतो अनेकदा जिप्सीतील इज्जत जमते तर कुठे जिप्सी खड्ड्यात जाऊन पडते अशी परिस्थिती असताना यावर वन्यजीव विभागाचे कुठलेही नियंत्रण दसऱ्याचे दुर्दैवाने पाहायला मिळते.

गर्दीच्या दिवशी अधिकारी अनुपस्थित : शनिवार आणि रविवारला पर्यटकांची मोठी गर्दी मेळघाटात उसळते. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे या भागातील अधिक जबाबदार अधिकारी अमरावती किंवा परतवाडा अशा आपल्या घरी जात असल्यामुळे या दिवशी पर्यटकांवर एखादे संकट कोसळले तर त्यांनी तक्रार कुणाकडे करावी अशी मोठी अडचण निर्माण होते.

मोबाईल फोनचे नेटवर्क नसल्याने मोठी अडचण : मेळघाटात मोबाईल फोनची रेंज नसल्यामुळे जंगलात उडवलेल्या संकटकाळात कुणाशीही संपर्क साधता येत नाही. अशा परिस्थितीत पर्यटकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो. घरात आठ जंगलातून जातात पर्यटकांकडून 120 ते 200 रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. या मार्गावर मात्र पर्यटकांचे वाहन बंद पडले किंवा कुठलेही संकट ओढावले तर पर्यटकांना मदतीसाठी कुठलीही सुविधा उपलब्ध होत नाही.

पर्यटकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष : अमरावती जिल्ह्यातील जैवविविधता समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत व-हेकर हे आपल्या कुटुंबांसह पाच नोव्हेंबरला मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैराट येथे जंगल सफारी करिता आले असतांना या सफारी मध्ये त्यांच्यासोबत लहान मुलं महिला व ज्येष्ठांचा समावेश होता सफारी करिता साडेतीन हजार रुपये शुल्क आकारून जिप्सी वाहन क्रमांक एम एच 27 एच 404 आणि एम एच 31 ए जी 1914 या दोन गाड्यांची नोंदणी केली. यापैकी एका जिप्सीवर चालकासह मार्गदर्शकही होता. यावेळी वाहन चालकाने खटारा जिप्सी अतिशय अंधाधुंद पद्धतीने चालवून ओळख रस्त्यावरील नालीत पाडली. या अपघातात डॉ. श्रीकांत वऱ्हेकर यांच्यासह त्यांचे वृद्ध आई-वडील पत्नी आणि मुलं जखमी झालेत. याबाबत त्यांनी वर अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांना कुठलेही उत्तर मिळाले नाही. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांकडे डॉक्टर वरेकर यांनी लेखी तक्रार दिली असताना केवळ चौकशी करू इतकेच त्यांना सांगण्यात आले. देशातील अतिशय उत्तम पर्यटन स्थळ असणाऱ्या मेळघाट बाबत अधिकाऱ्यांची अशी उदासीन भूमिका पर्यटकांचा हिरबोड करणारी तर आहेच मात्र मेळघाटातील मूळ आदिवासींच्या रोजगारावरही गदाअडणारी असल्याचे डॉ. श्रीकांत वऱ्हेकर ईटीव्ही भारत शी बोलताना म्हणाले. मेळघाटातील पर्यटन व्यवस्थेबाबत शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा अशी भावना देखील डॉ. वऱ्हेकर यांनी व्यक्त केली.

आरटीओ करणार तपासणी : मेळघाटातील पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जिप्सी गाड्यांची आरटीओकडून तपासणी केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जंगल सफारी करिता पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ह्या गाड्यांवर परवाण्याच्या अनुषंगाने व्याघ्र प्रकल्पाचा वनविभागाचा लोगो आवश्यक असतो तो परवाना गाडीच्या काचांवर दिसत नाही .पर्यटकांना देणाऱ्या गाडीचा चालक आणि मार्गदर्शकाला ड्रेस कोड आहे मात्र हा ड्रेस कोड पाळला जात नाही. याबाबतही चौकशी केली जाणार आहे. केवळ चिखलदरा येथेच 60 च्या वर जिप्सी पर्यटकांना घेऊन धावत असताना सेबाडोह कोलकास आणि नरनाळा अशा मेळघाटातील पर्यटन स्थळ परिसरात दोनशेच्या जवळपास जिप्सी गाड्या आहेत या सर्व गाड्यांची तपासणी आता केली जाणार आहे.

पर्यटकांकडून असे वसूल केले जाते शुल्क : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात फिरण्यासाठी बारा वर्षावरील प्रत्येक व्यक्तीस 30 रुपये इतके शुल्क आकारले जाते. जड वाहादासाठी 150 रुपये, मध्य वाहनासाठी शंभर रुपये शुल्क आकारले जाते. दुचाकी साठी 25 रुपये,भारतीय कॅमेरा सोबत असला तर शंभर रुपये शुल्क आकारला जातो. परदेशातील कॅमेरा सोबत असेल तर दोनशे रुपये शुल्क भरावे लागतात. याव्यतिरिक्त फोटोग्राफी किंवा संशोधनासाठी येणाऱ्या व्यक्तींना त्यांच्याकडे असणाऱ्या कॅमेऱ्यासाठी पाचशे रुपये शुल्क द्यावे लागते. परदेशातील कॅमेरा सोबत असेल तर 1000 रुपये शुल्क, सिनेमासाठी चित्रीकरण करायचे असल्यास भारतीय कॅमेरासाठी 5000 रुपये तर परदेशातील कॅमेरा असेल तर दहा हजार रुपये शुल्क वसूल केल्या जाते. व्यावसायिक छायाचित्रकारांकडून कॅमेरा सोबत असल्यास अडीच हजार रुपये शुल्क वसूल केले जाते. परदेशी कॅमेरा सोबत असल्यास पाच हजार रुपये शुल्क, सिनेमा चित्रीकरणाचा भारतीय कॅमेरा सोबत असल्यास दहा हजार रुपये शुल्क, परदेशी कॅमेरा सोबत असल्यास वीस हजार रुपये शुल्क आकारले जाते. जी व्यक्ती सायकलने जंगलात फिरणार असेल त्यांच्याकडून दहा रुपये शुल्क बेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने आकारला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.