ETV Bharat / state

अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दोघांचा मृत्यू; कोरोना चाचणीसाठी घेतले स्वॅबचे नमुने

मृत व्यक्तिच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पहाटे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तो परप्रांतीय असून काही वर्षांपासून तो अमरावतीत राहात होता इतकीच माहिती सध्या प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

took swab for corona test of two person in amravati after death
author img

By

Published : Apr 15, 2020, 8:47 PM IST

अमरावती - शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आज पहाटे दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही संभाव्य कोरोना रुग्ण होते का, याची खात्री करण्यासाठी दोघांचेही स्वॅब घेण्यात आले. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दगावलेला एक व्यक्ती नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बाबा चौक परिसरातील रहिवासी होता. त्याला हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे त्याच्यावर गत चार दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी त्याची प्रकृती खालवल्यामुळे त्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले. बुधवारी पहाटे त्याचे निधन झाले. त्याच्यावर सकाळी 10 वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पहाटे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तो परप्रांतीय असून काही वर्षांपासून तो अमरावतीत राहात होता इतकीच माहिती सध्या प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

अमरावती शहरात सध्या 5 कोरोना रूग्ण असून यापैकी एक दगावला आहे. जिल्ह्यात एकूण 4710 संभावित कोरोनाग्रस्तांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. स्वॅबचे 440 नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले. त्यापैकी 311 निगेटिव्ह आले असून 104 प्रलंबित आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.