अमरावती- पश्चिम विदर्भात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच वीज पडण्याच्या घटणेत देखील वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यात शेतात मोलमजुरी करणाऱ्या तीन महिला विज पडल्यामुळे जखमी झाल्या आहेत. ही धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर या गावाजवळ घडली. यातील एक महिला गंभीर जखमी असून तिला सेवाग्राम येथे हलविण्यात आले. तर दोन जखमी महिलांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
संगीता वानखडे, संगीता रोंघे, मंगला निर्मल असे जखमी महिलांचे नवे आहे. या तीन मजूर महिला गावाजवळ एका शेतात मोलमजुरी करत होत्या. दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा आणि पाऊस आला. शेजारी पडलेल्या विजेची त्यांना आस लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.
तसेच बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तरुणीचा रविवारी दुपारी वीज कोसळून मृत्यू झाला. ही तरूणी कवठा बहाळे या शिवारात मजुरी करत होती. पपिता मिश्रीलाल उईके (वय १८) असे तरूणीचे या नाव आहे.