ETV Bharat / state

जगण्याच्या संघर्षात पिण्याचे पाणीही मिळत नाही असे 'हे' गाव! पहा ईटीव्ही भारतचा एक रिपोर्ट - The story of Madizdap village

एका बाजूला परिस्थिती आणि प्रॉपर्टीचा हिशोब लावता येईना अशी परिस्थिती आहे. अन् एका बाजूला जगण्याच्या संघर्षात पिण्याचे पाणीही मिळत नाही मग शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांचे काय बोलणार? शाळा नाही, आरोग्य केंद्र नाही आणि रस्त्याचा तर कुठेच पत्ता नाही. अशा प्रत्ये मुलभूत गोष्टींचा अभाव सहन करत जगाणारे हे अमरावती जिल्ह्यात असलेले चिखलदरा तालुक्यातील माडिझपड हे गाव! ईटीव्ही भारतचा येथील परिस्थितीबाबतचा एक रिपोर्ट-

अमरावती जिल्ह्यात असलेले चिखलदरा तालुक्यातील माडिझपड हे गाव

author img

By

Published : Nov 9, 2021, 9:17 AM IST

Updated : Nov 9, 2021, 10:36 AM IST

अमरावती - आरोग्य केंद्राचा पत्ता नाही, शाळा नाही, बाजार नाही, वीजही नाही, पाणीसुद्धा सहज मिळत नाही. अशा सर्व समस्यांनी वेढलेले माडिझडप नावाचे एक गाव सातपुडा पर्वतरांगेत मेळघाटात वसले आहे. अमरावती शहरापासून हे गाव 175 किलोमीटर अंतरावर असून परतवाडा-धारणी मार्गावा सेमाडोह पासून उजव्या बाजूला 81 किलोमीटर जंगलाच्या आतमध्ये माडिझडप या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ताही नाही.

अमरावती जिल्ह्यात असलेले चिखलदरा तालुक्यातील माडिझपड हे गाव! ईटीव्ही भारतचा येथील परिस्थितीबाबतचा एक रिपोर्ट-

गावाची लोकसंख्या 474

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात माडीझडप हे गाव वसले आहे. गावाची लोकसंख्या 474 इतकी असून या गावात कोरकू आणि गवळी समाजाचे मिळून एकूण 68 कुटुंब गावात राहतात. कोरकू लोकांचा शेती हाचमुख्य व्यवसाय असून गवळी समाजाचे लोक मात्र गोपालन यावरच अवलंबून आहेत.

सौर ऊर्जेमुळे रात्री पडतो प्रकाश

मेळघाटातील अनेक गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचली नाही अशा गावांमध्ये माडिझडप या गावाचा ही समावेश आहे. वर्षभरापूर्वी या गावात एका कंपनीच्या वतीने शासनाने सौर ऊर्जेद्वारे विज पोहचवण्याचा प्रयत्न केला. सौर ऊर्जेमुळे गावातील छोट्याशा घरांमध्ये रात्रीचा कसा-बसा प्रकाश पडायला लागला आहे.

अमरावती जिल्ह्यात असलेले चिखलदरा तालुक्यातील माडिझपड हे गाव
अमरावती जिल्ह्यात असलेले चिखलदरा तालुक्यातील माडिझपड हे गाव

गावात पाण्याची टंचाई

माळी झडप गावालगत खोल दरीतून नदी वाहते असे असले तरी प्रत्यक्ष गावात मात्र पाण्याची टंचाई आहे. तीन-चार वर्षांपूर्वी एका संस्थेने गावात पाण्याच्या दोन टाक्या बसून दिल्या होत्या. तसेच गावाच्या खालून वाहणाऱ्या नदीलगत बोअरद्वारे या दोन टाक्यांमध्ये पाणी आणण्यात आले होते यामुळे ग्रामस्थांना पाण्याची सुविधा झाली. मात्र, गत वर्षभरापासून या टाक्या नादुरुस्त असल्यामुळे ग्रामस्थांना गावाच्या खालच्या भागातून पाणी आणावे लागत आहे.

शाळा शंभर किलोमीटर अंतरावर

माडिझडप या गावात प्राथमिक शाळा आहे. कोरोनामुळे बंद झालेली शाळा अद्यापही सुरू झाली नाही. या प्राथमिक शाळेत गावातील 30 ते 40 विद्यार्थी असून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घ्यायचे असेल तर या विद्यार्थ्यांसाठी गावापासून शंभर किलोमीटर लांब अंतरावरच शाळा उपलब्ध आहेत. या गावातील काही मुलं परत वाड्याला तर काही मुलं धारणी आणि चिखलदऱ्याला आश्रम शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

आरोग्य यंत्रणेचा पत्ता नाही

माडिझडप गावात कुठल्याही स्वरूपाच्या आरोग्य सुविधा नाही. गावात जर कोणी आजारी पडले तर त्याला प्राथमिक उपचार घेण्यासाठी 81 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच जावे लागते. गावात अधून-मधून आरोग्य कर्मचारी येत असले तरी नेमकी ज्यावेळेस गरज भासते त्यावेळी आरोग्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे कुठलेही साधन गावात उपलब्ध नाही.

अंगणवाडी केंद्रही राहते सतत बंद

लहान मुलांना पोषक आहार मिळण्याचे एकमेव भाषेचे केंद्र असणारे अंगणवाडी केंद्रसुद्धा अनेकदा बंदच राहते. या ठिकाणी पोषण आहाराचे वितरणही नियमित नाही गर्भवती महिलांना पोषक आहार तसेच लहान मुलांना अंडीसुद्धा या अंगणवाडी केंद्रातून मिळत नसल्याच्या तक्रारी काही महिलांनी ईटीव्ही भारताची बोलतांना केल्या.

गावाच्या पुनर्वसनाला काहींचा विरोध काहींचा होकार

अतिशय दुर्गम भागात वसलेल्या माडीझडप या गावाचेही इतर गावांप्रमाणे मेळघाट बाहेर पुनर्वसन करण्याची योजना शासनाने आखली आहे. गावकऱ्यांना पुनर्वसनासंदर्भात निर्णय घेण्याच्या सूचनाही शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र, गावातील आदिवासी बांधवांनी गावात आमची शेती असून आमचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. पुनर्वसन करताना आमच्याकडे आहे तितकीच शेती मिळावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी शासनाकडून केली आहे. शासनाकडून मात्र आर्थिक स्वरूपात मोबदला दिला जाईल असाच प्रस्ताव असल्यामुळे गावातील आदिवासी बांधवांचा पुनर्वसनाला नकार आहे. तर गावात वसलेल्या गवळी बांधवांचा मात्र पुनर्वसनाचा होकार आहे. मात्र, संपूर्ण गावाचेच एकमत नसल्यामुळे या गावाचे पुनर्वसन अद्याप होऊ शकलेले नाही. या गावाचे आज ना उद्या पूनर्वसन होईलच म्हणून शासनाकडून या गावापर्यंत जाण्यास साधा रस्ताही बांधून देण्यात आला नसल्याची वेदना ग्रामस्थांनीही ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा - उखडून फेकायचेच तर चीनने वसवलेले गाव आणि जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद उखडून फेका - शिवसेनेने भाजपाला सुनावले

Last Updated : Nov 9, 2021, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.