अमरावती - चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमजापूर येथील श्री संत एकनाथ महाराज देवस्थानच्या कळसावर वीज पडल्याने भिंत कोसळल्याची घटना रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर, मंदिराच्या कळसाची भिंत कोसळून नैसर्गिक नुकसान झाले आहे. मंदिराच्या आसपास घरे असून सुदैवाने कोणतिही जीवितहानी झाली नाही.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मागील तीन दिवसांपासून संपूर्ण विदर्भात पाऊस सुरू आहे. यामुळे एकीकडे बळीराजा सुखावला असला तरी दुसरीकडे मात्र अनेक शेतकऱ्यांचे नुकसानही होत आहे. तशातच काल (दि. 12 जून) मध्यरात्री विजांच्या गडगडाटासह अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली.
या पावसात वरुड मोर्शी तालुक्यामधील संत्रा पिकाला जबर फटका बसला. अंजनगाव सुरजी तालुक्यात देखील केळी उद्धस्त झाली आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातही या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे तालुक्यातील कळमजापूर येथील श्री संत एकनाथ महाराज यांच्या मंदिराच्या कळसावर वीज कोसळल्याने मंदिराच्या कळसाचा एक भाग कोसळला असल्याची घटना समोर आली आहे . सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, धामणगाव रेल्वे तालुक्यातही या पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांच्या गलथान कारभारामुळे शेकडो हेक्टर जमीनही पहिल्या पावसामुळे पाण्याखाली आली.
हेही वाचा - दुसऱ्यासाठी जेवण बनवणारेच आज स्वतःच्या पोटासाठी संकटात