ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली; इतर साहित्य घेण्यास निरुत्साह - अमरावती शालेय विद्यार्थी न्यूज

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची तयारी सुरू असतानाच शासनाकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले आहे. विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनी दुकानातून पुस्तके खरेदी केली आहे. पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांनी उत्साहात घेतली असली तरी शिक्षणासाठी लागणारे वही, पेन, पेन्सिल आदी साहित्य घेण्यास मात्र विद्यार्थी आणि पालक उत्सुक नसल्याचे चित्र अमरावतीत पहायला मिळत आहे.

Books
पुस्तके
author img

By

Published : Jun 30, 2020, 7:58 PM IST

अमरावती - कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यासह अमरावती शहर आणि जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची तयारी सुरू असतानाच शासनाकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले आहे. विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनी दुकानातून पुस्तके खरेदी केली आहे. पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांनी उत्साहात घेतली असली तरी शिक्षणासाठी लागणारे वही, पेन, पेन्सिल आदी साहित्य घेण्यास मात्र विद्यार्थी आणि पालक उत्सुक नसल्याचे चित्र अमरावतीत पहायला मिळत आहे.

अमरावती जिल्ह्यात विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकांचे वाटप झाले आहे

अमरावती जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत सर्व शासकीय तसेच अनुदानित शाळेतील पहिली ते पाचवीच्या 1 लाख 18 हजार 115 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. सर्व विषयांचे मिळून एकूण 5 लाख 38 हजार 615 पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले आहे. सहावी ते आठवीच्या 85 हजार 550 विद्यर्थ्यांना 5 लाख 90 हजार 560 पुस्तक शाळेच्या माध्यमातून वितरित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या एकूण 2 लाख 1 हजार 665 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत झाली असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी अशोक रामटेके यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

विनाअनुदानित शाळेतील विद्यर्थ्यांना पुस्तकांच्या दुकानातून पुस्तक खरेदी करावी लागतात. शाळांकडून मिळणाऱ्या सुचनांप्रमाणे पालक पुस्तकांची खरेदी करत आहेत मात्र, त्यासोबत लागणारे इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास पालक नकार देत आहेत. शहरातील सीबीएससी अभ्यासक्रम असणाऱ्या शाळांनी ऑनलाईन अभ्यास सुरू केला असून त्यांना पुस्तकांची सध्या गरज भासत नाही. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक अद्याप पुस्तक खरेदीसाठी आलेच नसल्याचे पुस्तक दुकानदार सांगतात.

माणिबाई गुजराती विद्यालयात सहावी ते आठवीपर्यंतची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वितरित केली आहेत. पाचवीच्या वर्गात विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप झाले नसल्याने पाचवीची पुस्तके जपून ठेवण्यात आल्याचे मुख्यध्यापिका अंजली देव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलवून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पाठ्य पुस्तकांचे वितरण केल्याचे खापर्डे बगीचा येथील आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यपिका स्नेहल विरुळकर यांनी सांगितले.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे सध्या तरी शाळेत विद्यार्थी येणार नाहीत हे स्पष्ट आहे. मात्र, तरीही विद्यार्थ्यांपर्यंत नवीन पाठ्यपुस्तके पोचली आहेत. कोरोनाची कुठलीही भीती न बाळगता अनेक मुलांनी अभ्यासाला सुरुवातही केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील तालुकानिहाय पुस्तक वितरण -

अमरावती तालुक्यात 10 हजार 483 विद्यार्थ्यांना 58 हजार 634 पुस्तकांचे वितरण करण्यात आले असून भातकुली तालुक्यात 8 हजार 482 विद्यार्थ्यांना 47 हजार 626, चांदुर रेल्वे तालुक्यात 8 हजार 467 विद्यर्थ्यांना 47 हजार 162, तिवसा तालुक्यातील 8 हजर 420 विद्यार्थ्यांना 47 हजार 309, अचलपूर तालुक्यातील 25 हजार 94 विद्यार्थ्यांना 1 लाख 21 हजार 175, चांदूरबाजार तालुक्यातील 17 हजार 356 विद्यर्थ्यांना 98 हजार 680, दर्यापूर तालुक्यातील 14 हजार 506 विद्यर्थ्यांना 66 हजार 155, वरुड तालुक्यातील 18 हजार 941 विद्यर्थ्यांना 1 लाख 1 हजार 531, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 10 हजार 326 विद्यार्थ्यांना 57 हजार 709, मोर्शी तालुक्यातील 15 हजार 598 विद्यार्थ्यांना 86 हजार 472, धारणी तालुक्यातील 26 हजार 547 विद्यार्थ्यांना 1 लाख 60 हजार 649, चिखलदरा तालुक्यातील 15 हजार 456 विद्यार्थ्यांना 79 हजार 172 आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील 10 हजार 211 विद्यार्थ्यांना 53 हजार 293 पाठ्यपुस्तकांचे वाटप पूर्ण झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.