ETV Bharat / state

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Suspended Chief Conservator of Forests Srinivasa Reddy was arrested in the Deepali Chavan suicide case
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक
author img

By

Published : Apr 29, 2021, 5:18 PM IST

अमरावती - मेळघाटातील हरिसाल वनपरिक्षेत्रात वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार मुख्य आरोपी शिवकुमार यांच्या न्यायालयीन कोठडी नंतर मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला बुधवारी सायंकाळी त्याच्या राहत्या घरून अमरावती पोलिसांनी अटक केली. यानंतर त्याला गुरूवारी पहाटे 5च्या सुमारास धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सकाळी धारणी पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर गुरूवारी दुपारी 1च्या सुमारास त्याला फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला प्रथम न्यायाधीशांनी 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक

मेळघाटातील बहुचर्चित हरीसाल वनपरिक्षेत्र अधिकरी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी उपवनसरक्षक शिवकुमार बाला व मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांच्या निवासस्थानी 25 मार्चला सायंकाळी स्वतावर गोळी झाडून आत्महत्या केली. यानंतर आरोपी शिवकुमार बाला याला अटक केल्यानतर त्यांच्या आत्महत्येला जबाबदार उपवनसंरक्षक आरोपी शिवकुमार बाला याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाचा तपास आयपीएस प्रज्ञा सरवदे यांच्याकडे देण्यात आला होता. रविवारी दुपारी त्यांनी हरीसाल येथे येऊन प्रकरणाची चौकशी केली. त्यांच्यासह विशेष महिला पोलीस अधिकारी अमरावती ग्रामीण पूनम पाटील यांनी शिवकुमार व मृत वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या कडून तपासकामी जप्त केलेली कागदपत्रे व लॅपटॉप मोबाइल यावरून सतत चौकशी सुरूच ठेवली होती. त्या चौकशी वरून मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने मुख्य आरोपी शिवकुमार बाला यांच्यावर कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्याच गुन्हात कलम 312 504 506प्रमाणे 4 एप्रिलला वाढ करून मुख वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला आरोपी करण्यात आले आहे.

तपासी अधिकरी पूनम पाटील याच्या आदेशांवरून स्थानिक गुन्हे शाखा अमरावती येथील पीएसआय मनीष चौधरी यांच्या टीम ने बुधवारी सायंकाळी त्याच्या नागपूर येथील निवास्थानावरून रेड्डीला ताब्यात घेतले. त्यांनतर गुरुवारी पहाटे पाच वाजता त्याला धारणी पोलिसांच्या ताब्यात दिले. पहाटे त्याला धारणी पोलिसांनी अटक करून त्याची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर 9 वाजेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. तेथून त्याला पोलीस ठाण्याच्या आवारातच असलेल्या एका रूममध्ये नेऊन त्याची तब्बल चार तास चौकशी केली. त्यांनतर पुन्हा पोलीस कोठडीत ठेवले. तपास अधिकारी पूनम पाटील ठणेदार विलास कुलकर्णी, एपीआय देवेन्द्र ठाकूर, पीएस आय मंगेश भोयरसह पोलीस कर्मचाऱ्यांनी दुपारी 1च्या दरम्यान त्याला धारणी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात हजर केले. असता तपासी अधिकारी पूनम पाटील सरकारी वकील बी. एम. भगत यांनी मृत दीपाली चव्हाण यांच्या वतीने युक्तिवाद केला. आरोपीची तापासकामी गरज असल्याने सात दिवसाचा पीसीआर देण्यात यावा अशी बाजू मांडली. आरोपी श्रीनिवास रेड्डी यांच्या वतीने अधिवक्ता मनीष जेसवाणी नागपूर हायकोर्ट यांनी पोलिसांना आरोपोची गरज नाही तर आरोपीचा या आत्महतेशी सबंध नाही, असा युक्तिवाद केला. यानंतर प्रथम न्यायाधीश एम. एस. गाडे याणी आरोपी श्रीनिवास रेड्डीला 1 मेपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.