ETV Bharat / state

Building Collapsed : अमरावती येथील दुर्घटनेतील मृतांना राज्य सरकारतर्फे पाच लाख रुपयांची मदत, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश.. - Building Collapsed in Amravati

शहरातील प्रभात चौक परिसरात इमारत कोसळल्याने दुर्दवी पाच जणांचा मृत्यू (5 died in Building Collapsed in Amravati ) झाला आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पाचही जणांच्या कुटुंबीयांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis )यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आम्ही केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देऊनही मदत जाहीर केली असल्याची माहिती, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली.

Building Collapsed in amravati
अमरावती शहरातील प्रभात चौक परिसरात इमारत कोसळल्याने दुर्दवी पाच जणांचा मृत्यू झाला
author img

By

Published : Oct 30, 2022, 9:22 PM IST

अमरावती : शहरातील प्रभात चौक परिसरात इमारत कोसळल्याने दुर्दवी पाच जणांचा मृत्यू (5 died in Building Collapsed in Amravati ) झाला आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पाचही जणांच्या कुटुंबीयांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis )यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आम्ही केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देऊनही मदत जाहीर केली असल्याची माहिती, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली.

अमरावती येथील दुर्घटनेतील मृतांना राज्य सरकारतर्फे पाच लाख रुपयांची मदत दिल्याची माहिती, खासदार रवी राणा देताना

गंभीर जखमींसाठी राज्य शासनाची मदत - या घटनेत दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांच्या उपचारासाठी देखील राज्य शासन आर्थिक मदत करणार असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली. अतिशय दुर्दैवी घटना असून शहरातील शिकस्त इमारती संदर्भात प्रशासनाने कुठलीही कारवाई का केली नाही याची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे, खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश - अमरावती शहरातील प्रभात चौक परिसरात इमारत कोसळून पाच जण ठार झाल्याची गंभीर घटना घडली असताना या प्रकरणात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी चौकशीचे आदेश दिले ( District Collector ordered an inquiry. ) आहेत. ड्युटीवर असणारे महापालिका आयुक्त अमरावती येताच या प्रकरणाची चौकशी सुरू होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Building Collapsed in amravati
अमरावती शहरातील प्रभात चौक परिसरात इमारत कोसळल्याने दुर्दवी पाच जणांचा मृत्यू झाला

मृतांची ओळख पटली - या गंभीर घटनेतील मृत व्यक्तींची ओळख पटली असून यामध्ये रवी परमार राहणार साईनगर, यांच्यासह मोहम्मद आरिफ शेख रहीम, रिजवान शहा रफिक शेख, मोहम्मद कमर राहणार उस्मान नगर आणि देवा नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे.मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. या गंभीर घटनेत दगावलेल्या पाचही व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल - ही घटना घडतात पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यासह पोलीस उपायुक्त विक्रम साळी महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री बोरेकर घटनास्थळी उपस्थित होत्या. घटना घडल्यावर सर्वात आधी इमारतीच्या ढिगाराखाली दबलेल्या पाच जणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दिगाराखाली दबलेल्या पाचही मृतदेहांना बाहेर काढल्यावर आता रस्त्यावर पडलेला इमारतीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.