अमरावती: माळ्यावरून धारणीपर्यंतचा मार्ग हा जंगलातून जातो. वळणदार मार्गावरून सातपुडा पर्वत चढत असताना चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या घाटालगत बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर ही बस खोल दरीत कोसळली. सुदैवाने दरीमध्ये असणाऱ्या एका मोठ्या झाडाला ही बस अडकली. या अपघातात बस चालक मोहम्मद मुजाहिद जखमी झाले असून त्यांच्यासह सात प्रवासी देखील जखमी आहेत. अपघातातील जखमींना परतवाडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सुदैवाने अनर्थ टळला: मेळघाटात अतिशय धोकादायक वळणावर ही एसटी बस दरीत कोसल्यावर दहा ते पंधरा फुटावर दरीतील मोठ्या झाडांना अडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच चिखलदरा आणि परतवाडा येथून पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. यानंतर बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवासांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी परतवाडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परतवाडा आगारातून दुसरी गाडी प्रवाशांच्या सुविधेसाठी पाठवण्यात आली.
ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत कोसळली: भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत पडल्याने झालेल्या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 22 जण गंभीर जखमी झाले. ही घडना राजस्थानमधील झुंझुनूच्या उदयपुरवती परिसरात 29 मे, 2023 रोजी सायंकाळी घडली.
जखमींना रुग्णालयात दाखल: पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, झुंझुनूच्या उदयपुरवती परिसरात मानसा मातेचे दर्शन घेऊन हे लोक परतत होते. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भाविकांनी भरलेली ट्रॉली डोंगरावरून खोल दरीत कोसळली. या अपघातात 9 जणांना जीव गमवावा लागला. जखमींना उदयपुरवती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. खुशाल यादव, एसपी मृदुल कछावा हेही उदयपुरवती रुग्णालयात पोहोचले. जखमी भाविकांची अवस्था जाणून घेतल्यानंतर त्यांनी उदयपुरवती रुग्णालयाबाहेर थांबलेल्या जखमींच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांना धीर दिला.
हेही वाचा: