अमरावती - सध्या पश्चिम हिमालयामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स (भूमध्यसागरी भागात उद्भवणारे बाह्य वादळ) सक्रिय असून हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारेसुद्धा आहेत. त्यांच्या प्रभावामुळे राजस्थानवर सुद्धा ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे निर्माण झाले आहेत. तसेच, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाची स्थिती आहे आणि कर्नाटक किनारपट्टी ते मध्य महाराष्ट्रात कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा - आधी पीक कर्जाचे व्याज भरा, नंतर शासन देणार थेट भरपाई
विदर्भात ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पाऊस
या सर्व परिस्थितीमुळे तसेच पश्चिमेकडून येत असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि पूर्वेकडून बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या बाष्पयुक्त वार्याच्या संगमामुळे विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तीन ते चार दिवस विदर्भात ढगाळ वातावरण व पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
10 तारखेनंतर विदर्भात पुन्हा थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता ढगाळ वातावरण असल्याने तापमानात देखील वाढ झाली आहे. हीच परिस्थिती पुढील चार-पाच दिवस कायम राहणार असून त्यानंतर 10 तारखेनंतर तापमान कमी होण्याची शक्यता आहे.
तूर पिकाला धोका
सध्या तुरीची काढणी चालू असल्यामुळे तुरीचे पावसामुळे नुकसान होऊ शकते त्याचा दर्जा माल खराब होऊ शकते. तर रब्बी हंगामातील गहू हरभरा या पिकालाही पावसाचा फटका बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे
हेही वाचा - 'काँग्रेस नेत्यांची हुशारी बघा...! शेतीतून 'इनकम' दाखवून 'टॅक्स' वाचवतात'