ETV Bharat / state

अमरावतीत जिल्ह्यात डेल्टा प्लसचे सहा रुग्ण - डेल्टा प्लस कोरोना बातमी

अमरावती शहरात तीन तर वरुड, मोर्शी आणि चांदूरबाजार तालुक्यात प्रत्येकी एक, असे जिल्ह्यात एकूण सहा डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.

c
c
author img

By

Published : Aug 25, 2021, 9:03 PM IST

अमरावती - कोरोनाच्या कहारातून अमरावती शहर आणि जिल्हा कसाबसा सावरायला लागला असतानाच आता अमरावतीत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात डेल्टा प्लसचे एकूण सहा रुग्ण आढळून आले आहेत.

अमरावतीत जिल्ह्यात डेल्टा प्लसचे सहा रुग्ण

शहार आणि ग्रामीण भागात प्रत्येकी तीन रुग्ण

जिल्ह्यात आढळून आलेल्या सहा रुग्णांपैकी तीन रुग्ण हे अमरावती शहारातील असून वरुड, मोर्शी आणि चांदूरबाजार तालुक्यतातील ग्रामीण भागात एकूण तिघांना डेल्टा झाला आहे. या सहाही जणांची चाचणी तीन महिन्यांपूर्वी करण्यात आली असून सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. या सर्व सहा रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी करण्यात आली असल्याचे डॉ. रणमले यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसले तरी कोरोनाकाळात ज्याप्रमाणे काळजी घेतली तशीच खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. हात सतत धुणे, नाकाला तोंडाला मास्क बांधणे आणि एकमेकांसोबत अंतर राखून राहण्याचा सल्लाही डॉ. रणमले यांनी दिला.

पालकमंत्र्यांनी केले गांभीर्याने वागण्याचे आवाहन

अमरावती जुलै, ऑगस्ट महिन्यात डेल्टाचे सहा रुग्ण आढळले असून ही अतीशय गंभीर बाब असल्याचे जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हंटले आहे. आपण आपल्याला जपून ठेवायला हवे. सगळं गांभीर्याने घेतले पाहिजे. कोरोनाचे नियम सगळ्यांना पाळणे गरजेचे असून काळजी घेण्याची आवाहनही यशोमती ठाकूर यांनी अमरावतीकरांना केले आहे.

हेही वाचा - हुकूमशाही संपविण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच पर्याय; आमदार रवी राणांचं वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.