ETV Bharat / state

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - अमरावती जिल्हा बातमी

हरिसालच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलीस कोठडीत असलेला निलंबित मुख्य वनरक्षक अधिकारी श्रीनिवास रेड्डी याची आता चार दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

रेड्डी
रेड्डी
author img

By

Published : May 1, 2021, 3:06 PM IST

Updated : May 1, 2021, 3:51 PM IST

अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसालच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलीस कोठडीत असलेला निलंबित मुख्य वनरक्षक अधिकारी श्रीनिवास रेड्डी याला आज (दि. 1 मे) धारणीच्या न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयायीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता दिपाली चव्हाण प्रकरनातील सह आरोपी असलेल्या श्रीनिवास रेड्डीच्या अडचणीत वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वीच त्याला धारणी पोलीसांनी नागपुरातून अटक केली होती. त्यानंतर त्याला गुरुवारी न्यायालयात दाखल केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दरम्यान, श्रीनिवास रेड्डीला जामीन मिळावा यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले. पण, गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर राज्यभर पडसाद उमटले होते. रेड्डीच्या अटकेची मागणी जोर धरली होती. घटनेच्या 26 दिवसांनी त्याला अटक करण्यात आली होती.

हेही वाचा - अमरावती : कोरोनाबाधित गाव बंद करण्यात प्रशासन अपयशी; प्रतिबंध क्षेत्रातून नागरिकांची सर्रास ये-जा

हेही वाचा - मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवजात अर्भक रूग्णवाहिका

Last Updated : May 1, 2021, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.