अमरावती - लोकसभा निवडणुकीतील आनंदराव अडसूळ यांच्या पराभव झाला. या पराभवाचे खापर अभिजित अडसूळ यांनी भाजपवर फोडणे, हा त्यांचा पोरकटपणा असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा पराभव भजपनेच केला, असा आरोप अभिजित अडसूळ यांनी 1 जून रोजी केला होता. अभिजित अडसूळ यांनी केलेल्या आरोपाबाबत आज भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना अभिजित अडसूळ यांच्या आरोपाचे खंडन केले. तसेच त्यांनी अडसुळांनी पराभवाची करणे शोधण्यासाठी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही दिला आहे.
आनंदराव अडसूळ हे 10 वर्षांपासून खासदार होते. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी करणे हे त्यांचेही काम होते. तसेच त्यांच्या विरोधात संपूर्ण मतदारसंघात वातावरण होते. भाजपने तन, मन, धनाने प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे अडसुळांचा निसटता पराभव झाला. भाजपने प्रामाणिक काम केले नसते, तर अडसुळांची अवस्था केविलवाणी झाली असती, हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे, असेही ते यावेळी म्हणाले.