ETV Bharat / state

Rajabhau More died : नाटक पाहत असतानाच ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांनी नाट्यगृहात घेतला अखेरचा श्वास - ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे

संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ( Music Surya Keshavrao Bhosle Theatre ) ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे ( Senior dramatist Rajabhau More ) यांचे आयोजित हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेतील नाटक ( Drama in Amateur Marathi State Drama Competition ) पाहताना निधन झाले.

Rajabhau More died
ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन
author img

By

Published : Dec 16, 2022, 10:36 AM IST

अमरावती : ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे ( Senior colorist Rajabhau More ) वय 73 यांचे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ( Music Surya Keshavrao Bhosle Theatre ) आयोजित हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेतील नाटक ( Drama in Amateur Marathi State Drama Competition ) पाहताना निधन झाले. त्यांच्या जाण्याने अमरावती शहर आणि जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रात मोठी पोकळी ( Huge gap in cultural and theater sector) निर्माण झाली आहे.

आयुष्यभर केली रंगभूमीची सेवा : अमरावती शहरातील रहिवासी असणारे राजाभाऊ मोरे यांनी दिग्दर्शक नेपथ्यकार म्हणून दीर्घकाळ हौशी व प्रायोगिक रंगभूमीची सेवा केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अमरावती शाखेची स्थापना करून त्या माध्यमातून राजाभाऊ मोरे अव्यहातपणे रंगसेवा करीत होते. गणेशोत्सवात त्यांनी उभारलेले आकर्षक देखावे अमरावती करांच्या कायम स्मरणात राहणारे आहेत. शहरातील सर्वात जुन्या आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाचे ते पदाधिकारी होते. राज्य नाट्य स्पर्धा हा त्यांचा श्वास होता. 5 डिसेंबर पासून अमरावतीच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हौशी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली होती. नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीच्या नाटकापासून बुधवारी आयोजित थँक्यू मिस्टर ग्लाड हे नाटक पाहण्यासाठी देखील राजाभाऊ मोरे उपस्थित होते. नाटक पाहत असतानाच त्यांची रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्राणज्योत मालवली.

सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली शोकभावना : ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मीचा आधारवड हरपल्याची शोकभावना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. आज सकाळी 11 वाजता राजाभाऊ मोरे यांच्या बुधवारा परिसरातील निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.