ETV Bharat / state

शिवशाही अपघाताचे सत्र सुरूच... अमरावतीत स्कूल व्हॅनला धडक - शिवशाही बस अपघात न्यूज

अचानक थांबल्यामुळे शिवशाही बसची जोरदार धडक स्कूल व्हॅनला बसली. या अपघातात स्कूल व्हॅनमधील दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली.

school van and shivshahi bus accident in amravati
शिवशाहीच्या अपघाताचे सत्र सुरुच
author img

By

Published : Dec 13, 2019, 6:45 PM IST

अमरावती - गर्ल्स हायस्कूल चौक ते माळ टेकडी मार्गावर एका रिक्षाने कट मारल्यामुळे दुचाकीस्वार दुचाकीसह खाली पडला. समोर दुचाकीस्वार पडल्यामुळे मागून येणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाने अचानक ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली. त्यामुळे मागून येणारी शिवशाही बस समोरील स्कूल व्हॅन जोरात आदळली. या अपघातात स्कूल व्हॅनमधील दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली.

मनीष ठाकरे - पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे

हेही वाचा - अमरावतीत पोलीस व्हॅनची कारला धडक; तिवसा पोलिसात गुन्हा दाखल

दरम्यान, शिवशाही बस दर्यापूरहून नागपूरला जाणार होती. अपघातावेळी ही बस अमरावती बस स्थानकाकडे निघाली होती. मागील काही दिवसांपासून शिवशाही बसच्या अपघातात वाढ होत असल्याचे चित्र आहे.

घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी शिवशाही बससह स्कूल व्हॅन जप्त केली असून पोलीस ठाण्यात आणली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

Intro:ऑटो रिक्षा चालकांच्या चुकीमुळे एक दुचाकीस्वार खाली कोसळला. दुचाकीस्वार खाली कोसळल्यामुळे दुचाकी मागून येणाऱ्या स्कूल व्हॅनच्या चालकाने व्हॅनचे ब्रेक दाबले. स्कूल व्हॅन अचानक थांबल्यामुळे मागून येणाऱ्या शिवशाही बसने स्कूल व्हॅनला धडक दिली .या अपघातात स्कूल व्हॅनमध्ये स्वार दोन विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला. गर्ल्स हायस्कूल चौकात आज दुपारी हा अपघात झाला.

Body:गर्ल्स हायस्कूल चौक ते माळ टेकडी मार्गावर एका ऑटो रिक्षाने कट मारल्यामुळे दुचाकीस्वार दुचाकीसह खाली पडला. आपल्यासमोर दुचाकी स्वार पडल्यामुळे स्कूल व्हॅनचालकाने अचानक ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली.दरम्यान स्कूल व्हॅनच्यामागे दर्यापूरहुन नागपूरला जाणारी शिवशाही बस अमरावती बस स्थानकाकडे निघाली असताना बस समोरील स्कूल व्हॅन अचानक थांबल्यामुळे बसची जोरदार धडक स्कूल व्हॅनला बसली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. स्कूल बसमध्ये स्वार दोन विद्यार्थ्यांना या अपघातात किरकोळ इजा झाली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले . पोलिसांनी शिवशाही बससह स्कूल बेन जप्त करून पोलीस स्टेशनला आणली असून पोलीस याप्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती गाडगेनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.