ETV Bharat / state

माझे कष्ट, मेहनत पाहून मोदींनी दिली खासदारकी - संभाजी राजे - NARENDR MODI

शनिवारी सायंकाळी डॉ. पंजाबराव देशमुख समाजसेवा मंच आणि अखिल भारतीय शिवराज्यभिषेक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर संस्कृती भवन येथे सृष्टी देशमुखचा नागरी सत्कार करण्यात आला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला खासदार संभाजी राजे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

संभाजी राजे
author img

By

Published : Jul 21, 2019, 12:07 AM IST

अमरावती - "छत्रपती शिवाजी महाराजांचा मी वारस आहे. छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूरचा झालेला सर्वांगीण विकास असा आमच्या कुटुंबाचा भक्कम वारसा असतानाही २००९ च्या निवडणुकीत मी कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक हरलो. मात्र, त्यानंतर खऱ्या अर्थाने २०१३ साली घराबाहेर पडलो आणि खानदेश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. शिवाजी महाराजांचा वारस आपल्या घरी येत असल्याचा आनंद लोकांना वाटायचा. माझी ही मेहनत आणि कष्ट पाहून २०१६ साली पंतप्रधान मोदी यांनी मला खासदार म्हणून संधी दिली." असे खासदार संभाजी राजे अमरावतीत म्हणाले.

संभाजी राजे

धामणगाव तालुक्यातील सृष्टी देशमुख ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचव्या क्रमांक मिळवला. शनिवारी डॉ. पंजाबराव देशमुख समाजसेवा मंच आणि अखिल भारतीय शिवराज्यभिषेक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी संत ज्ञानेश्वर संस्कृती भवन येथे सृष्टी देशमुखचा नागरी सत्कार करण्यात आला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला खासदार संभाजी राजे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जिल्हाधिकारी शैलेश नवल आणि रेशीम संचालनालयाच्या आयुक्त भाग्यश्री बानाईत प्रामुख्याने उपस्थित होत्या.

संभाजी राजे पुढे म्हणाले, "मला माझ्या परिश्रमाचे फळ म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला राज्यसभेत खासदार केले. आपल्याला यश येईल अथवा नाही मात्र आपण आपली चिकाटी, परिश्रम सतत सुरू ठेवायला हवेत फळ निश्चित मिळतेच." असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Intro:छत्रपती शिवाजी महाराजांचा मी वारस. छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरचा झालेला सर्वांगीण विकास असा आमच्या कुटुंबाचा भक्कम वारसा असतानाही 2009 च्या निवडणुकीत मी कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक हरलो.मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने 2013 ला घराबाहेर पडलो आणि खान्देश,विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. शिवाजी महाराजांचा वारस आपल्या घरी येत असल्याचा आनंद लोकांना वाटायचा. माझी ही मेहनत आणि कष्ट पाहून 2016 साली पंतप्रधान मोदी यांनी मला राष्ट्पती नामीत खासदार म्हणून संधी दिली असे खासदार संभाजी राजे अमरावतीत म्हणाले.

Body:अमरावतीच्या धामणगाव तालुक्यातील आणि सध्या भोपाळला असणारी सृष्टी देशमुख ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचवी मेरिट आली.आज डॉ. पंजाबराव देशमुख समाजसेवा मंच आणि अखिल भारतीय शिवराज्यभिषेक समिती यांच्या संयुक्तवतीने शनिवारी सायंकाळी संत ज्ञानेशवर संस्कृती भवन येथे सृष्टी देशमुखचा नागरी सत्कार करण्यात आला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला खासदार संभाजी राजे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि रेशीम संचालनालयाच्या आयुक्त भाग्यश्री बानाईत प्रामुख्याने उपस्थित होत्या.
यावेळी खासदार संभाजी राजे यांनी मला माझ्या परिश्रमाचे फळ म्हणून पंतवर्धन नरेंद्र मोदी यांनी मला राज्यसभेत खासदार केले. आपल्याला यश येईल अथवा नाही मात्र आपण आली चिकाटी, परिश्रम सतत सुरू ठेवायला हवेत फळ निश्चित मिळतेच असा सल्ला सभागृहात खचून गर्दी करून असलेल्या विद्यार्थ्यांना केले.
सत्काराला उत्तर देताना सृष्टी देशमुख हिने अभ्यास करताना सकारात्मक दृष्टिकोण ठेवणे, प्रेरणादायी व्यक्तींच्या संपर्कात राहणे, प्रेरणादायी चित्रपट व पुस्तकांचे छंद जोपासणेही तितकेच महत्वाचे असल्याचे सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.