ETV Bharat / state

तुकडोजी महाराजांची समाधी दर्शनासाठी खुली; 19 ऑक्टोंबरपासून पुण्यतिथी महोत्सव

सर्व धर्म समभाव व एकतेचे प्रतीक असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची महासमाधीही आज पहाटे सामुदायीक ध्यानानंतर गुरुदेव भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून गुरुदेव भक्तांनी तुकडोजी महाराजांचे दर्शन घ्यावे असे आवाहनही गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गुरुदेव भक्तांना करण्यात आले आहे.

author img

By

Published : Oct 8, 2021, 9:42 AM IST

अमरावती
Amravati

अमरावती - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यभरातील धार्मिक स्थळे, पूजा करण्याची ठिकाणे, प्रार्थनास्थळे आज पासून सार्वजनिक रित्या खुली करण्यात आली. सर्व धर्म समभाव व एकतेचे प्रतीक असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची महासमाधीही आज पहाटे सामुदायीक ध्यानानंतर गुरुदेव भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून गुरुदेव भक्तांनी तुकडोजी महाराजांचे दर्शन घ्यावे असे आवाहनही गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गुरुदेव भक्तांना करण्यात आले आहे. दरम्यान यंदाही येत्या 19 ऑक्टोंबर ते २६ ऑक्टोंबर दरम्यान गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराजांचा 53 वा पुण्यतिथी महोत्सव पार पडणार आहे. या पुण्यतिथी महोत्सवाला दरवर्षी देशभरातून लाखो गुरुदेव भक्त येत असतात. परंतु कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता 25 तारखेला गुरुदेव भक्तांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली आपल्या घरुनच वाहण्याचे आवाहन देखील गुरुदेव सेवा मंडळाने केले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची महासमाधीही आज पहाटे सामुदायीक ध्यानानंतर गुरुदेव भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे.

अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 53 वा पुण्यतिथी महोत्सव गुरुकुंज मोझरीत येत्या 19 ते 26 ऑक्टोंबर या कालावधीत कोरोना प्रतिबंधक नियम पाळून मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थित यंदाही पार पडणार आहे. या पुण्यतिथी महोत्सवातील हृदयस्पर्शी व महत्वाचा असलेला मौन श्रद्धांजली कार्यक्रम हा 25 तारखेला पार पडणार असून 26 तारखेला गोपाल काल्याने या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. दरम्यान यावर्षी पुण्यतिथी कालावधीत बाहेर गावातील गुरुदेव भक्तांना 24 ऑक्टोंबरपर्यंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शनाची मुभा देण्यात येणार आहे. मात्र, 25 तारखेला मौन श्रद्धांजली ही आपआपल्या गावातून व घरूनच राष्ट्रसंताना अर्पण करावी असे आवाहन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला दरवर्षी हजारो पालख्यासह लाखो गुरुदेव भक्त हजेरी लावत असतात. परंतु दोन वर्षापासून राज्यावर असलेले कोरोनाचे सावट लक्षात घेता मागील वर्षीही मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत हा पुण्यतिथी महोत्सव पार पडला होता. यंदाही मोजक्यात गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 19 तारखेला सकाळी चार वाजता तीर्थ स्थापने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. तर 26 तारखेला गोपाल काल्याने सांगता होणार आहे. दरवर्षी पुण्यतिथी महोत्सव हा गुरुदेव विद्यामंदिराच्या प्रांगणात होत असतो. परंतु मागील वर्षी हा पुण्यतिथी महोत्सव सुसंस्कार स्मृती मंदिरात पार पडला होता. यंदाही त्याच ठिकाणी पार पडणार असून मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा प्रार्थना मंदिरात संपन्न होणार असल्याची माहिती देण्यात आली.

राज्यभरात घेतली जाणार रक्तदान शिबिरे -

राज्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता. तुकडोजी महाराजांच्या 53 पुण्यातिथी महोत्सवाच्या निमित्ताने यंदा राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात 53 त्यापेक्षा जास्त बॉटल रक्तदान संकलन हे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून केले जाणार आहे. अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आपल्या जिल्ह्यात हे शिबीर आयोजित करणार आहे. याच्या माध्यमातून हजारो बॉटल रक्त जमा केले जाईल. विशेष म्हणजे तुकडोजी महाराज यांनी आपल्या हयातीत रक्तदान केले आहे.

पुण्यतिथी महोत्सवात सहभागी व्हा -

कोरोनामुळे गर्दी करता येत नसली तरी प्रत्येक गुरुदेव भक्ताला या पुण्यतिथी महोत्सवात सामील होता यावे यासाठी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने "श्री गुरुदेव टीव्ही" या यूट्यूब चॅनलवर सातही दिवस विविध कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण ऑनलाइन पध्दतीने केले जाणार आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गुरुदेव भक्तांना घरबसल्या हा कार्यक्रम पाहता येणार असून या कार्यक्रमात सहभाग घेता येणार आहे.

गावा-गावात आरोग्य शिबिरे -

तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव हा गावागावात आरोग्य शिबिरे घेऊन साजरा करावा, असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळाने केले आहे. तुकडोजी महाराज यांनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी दिल आहे. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजसेवा घडावी यासाठी आरोग्य शिबिर घेऊन गोरगरिबांना आरोग्य सुविधा द्याव्या, असे आवाहनही त्यांनी गावागावातील गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखेतील पदाधिकाऱ्यांना केले आहे.

यात्रा नाही -

यंदा कोरोना नियमांत शिथिलता असली तरी यात्रा मात्र यंदाही भरली जाणार नाही. सात दिवस पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जाईल. परंतु या दरम्यान भरणारी मोठी यात्रा ही भरवली जाणार नसल्याची माहितीही देण्यात आली.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या नवदुर्गा : इन्फोसिस मधील नोकरी सोडून पूर्णब्रम्हा रेस्टॉरंटची स्थापना; जाणून घ्या 'या' दुर्गेचा प्रवास...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.