ETV Bharat / state

Omicron fear in Amravati : लसीकरण केंद्रांवर नागरिकांची उसळली गर्दी - Omicron fear in Amravati

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरीयंटबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील ( Sant Gadge Baba Amravati University Amravati ) कोरोना चाचणी केंद्राकडून दिल्ली येथील आरोग्य विभागाचे राष्ट्रीय देखरेख केंद्राने सिटी स्कोअर 30 पर्यंत असणारे स्वॅब मागविले आहेत. ही माहिती विद्यापीठातील चाचणी केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे ( Amravati corona testing center chief Dr Prashant Thakare ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. अमरावतीत ओमिक्रॉनची लक्षणे असलेला कोणताही रुग्ण आढळून आला नाही.

कोरोना चाचणी केंद्र
कोरोना चाचणी केंद्र
author img

By

Published : Nov 29, 2021, 10:26 PM IST

Updated : Nov 29, 2021, 10:54 PM IST

अमरावती - ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत डोंबिवली येथे आलेला एका व्यक्तीला कोरोनाची लागण होताच राज्य सरकारच्यावतीने खबरदारीचे आदेश दिले आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथील कोरोना चाचणी केंद्रातही याबाबत सतर्कता पाळली जात आहे. ओमिक्रॉनच्या भीतीमुळे अमरावती शहरातील विविध भागात कोरोना लसीकरण केंद्रांवर ( rush at vaccination centers in Amravati ) गर्दी वाढली आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरीयंटबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कोरोना चाचणी केंद्राकडून दिल्ली येथील आरोग्य विभागाचे राष्ट्रीय देखरेख केंद्राने सिटी स्कोअर 30 पर्यंत असणारे स्वॅब मागविले आहेत. ही माहिती विद्यापीठातील चाचणी केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. अमरावतीत ओमिक्रॉनची लक्षणे असलेला कोणताही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे भीती नाही. मात्र, सतर्कता बाळगणे, मास्कचा वापर करणे, ही काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक असल्याचे प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे ( Prashant Thakare on corona protocols ) यांनी स्पष्ट केले.

लसीकरण केंद्रावर नागरिकांचा वाढला प्रतिसाद

हेही वाचा-Omicron Variant : ओमिक्रॉनसंदर्भात मंत्रिमंडळ बैठक.. परदेशातील प्रवाशांची माहिती गोळा करा, मुख्यमंत्र्याचे निर्देश

लसीकरण केंद्रांवर वाढली गर्दी

ओमिक्रॉनची धास्ती आणि लस घेतल्याशिवाय सरकारच्या अनेक योजनेपासून वंचित राहावे लागेल या भीतीमुळे अमरावती शहरात लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी वाढली आहे. अमरावती महापालिका प्रशासनाच्यावतीने लसीकरणावर भर दिला जात आहे. नागरिकांनी त्वरित लसीकरण करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यावतीने ( Amravati commissioner Prashant Rode on vaccination ) करण्यात आले आहे.

हेही वाचा-vaccination certificates compulsory for Best : बेस्ट प्रवासाकरिता दोन लशींचे प्रमाणपत्र बंधनकारक

या परिसरातील महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये लसीकरण मोहीम

शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय यासह महापालिकेच्या दस्तुर नगर, बडनेरा , भाजीबाजार, महेंद्र कॉलनी, मसानगंज सबनीस प्लॉट, विलास नगर, बिच्छू टेकडी, बडनेरा जुनीवस्ती, बडनेरा नवी वस्ती, चिलम छावणी, यास्मिन नगर जमीन कॉलनी, गुलिस्ता नगर , छाया नगर, मौलाना आजाद कॉलनी , नूर नगर , लालखडी, गुलजार नगर, आशियाना, वीटभट्टी, वडाळी व छाया नगर या परिसरातील महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

हेही वाचा-Paithani birthday cake : मनसे नेते बाळा नांदगावकरांच्या पत्नीचा वाढदिवसाच्या निमित्ताने बनवला चक्क पैठणी केक

जिल्ह्यात 15 कोरोना सक्रिय रुग्ण-

अमरावती जिल्ह्यात सध्या घडीला ( Amaravati corona update on 29th Nov 2021 ) एकूण 15 कोरोना रुग्ण आहेत. यापैकी दहा रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तर पाच रुग्ण हे अमरावती शहरातील आहेत. यापैकी तीन रुग्ण तोरणा रुग्णालयात उपचार घेत आहेत. अमरावती शहरातील तीन रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. तर ग्रामीण भागातील गृह विलगीकरणात 9 रुग्ण आहेत.

Last Updated : Nov 29, 2021, 10:54 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.