अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या रेल्वेच्या ब्रॉडगेजमुळे व्याघ्र प्रकल्पातील वाघ व अन्य वन्य जीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या रेल्वेचं मीटर गेजमधून ब्रॉडगेज करू नका. त्याबदल्यात दुसरा मार्ग तयार करा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे दीड महिन्यापूर्वी केली होती. परंतु,आता मुख्यमंत्र्यांच्या या मागणीला सत्ताधारी युवक काँग्रेस व प्रहारनेच विरोध केल्याने अमरावतीमध्ये पुन्हा सत्ताधारी पक्षांमध्ये राजकारण रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अमरावतीत मुख्यमंत्रीविरुद्ध युवक काँग्रेस आणि प्रहार; मेळघाट रेल्वे ब्रॉडगेजवरून रंगले राजकारण
मीटर गेजचे ब्रॉडगेज न करता हा रेल्वेमार्गच बदला या मुख्यमंत्र्याच्या मागणीला केवळ युवक काँग्रेसचाच विरोध आहे असे नाही. तर, यापूर्वीही अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही याला विरोध केला होता. आता युवक काँग्रेससह शिवसेला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झालेल्या प्रहारचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या मागणीला कडाडून विरोध केला असून हा आदिवासींच्या सोयींचा प्रश्न असल्याचे आमदार राजकुमार पटेल यांनी म्हटले आहे.