अमरावती - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महानुभाव पंथाचे कार्य एकमेकांना पूरक असून दोघांचीही नाळ घट्ट जुळलेली आहे. धर्म संस्कृतीच्या रक्षणाचे हे कार्य असेच अविरत पुढे सुरू राहील, असा विश्वास सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.
![bhagvat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/img-20190618-wa00201560859978702-46_1806email_1560859990_453.jpg)
येथील राजापेठ परिसरात कंवरनगर येथील महानुभाव आश्रमात डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी सकाळी भेट दिली. आश्रमाचे नवे उत्तराधिकारी आचार्य मोहनराज कारांजेकर यांचा डॉ. मोहन भागवत यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यानंतर आश्रमाच्या वतीने डॉ. मोहन भागवत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महंत नांदेडकर बाबा, पैठणकर बाबा, जयराज बाबा, संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर, अमरावती विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू, महानगर संघचाल सुनील सरोदे, नगर संघचालक अविनाश चुटके, श्याम नीचीत, विभाग कार्यवाहक शिवा पिंपळकर, महानगर कार्यवाहक संजय गुळवे आदी उपस्थित होते.
![bhagvat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/img-20190618-wa00181560859978703-2_1806email_1560859990_778.jpg)