अमरावती - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यापैकीच गर्दीवर नियंत्रण हा महत्त्वाचा उपाय असून कोरोना किती घातक आहे, हे अमरावतीकारांच्या लक्षात आणून देण्याकरिता पोलिसांनी 'रेड कोरोना'ची मदत घेतली. पोलिसांचा हा 'रेड कोरोना' पाहून 'भागो कोरोना आया', अशी प्रतिक्रिया शहरात उमटली. विषेध म्हणजे पोलिसांच्या या उपक्रमाचा परिणाम म्हणजे शहरातील गर्दी नेहेमीपेक्षा कमी झाली.
विनाकारण फिरू नका -
शहरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. रविवारी जिल्ह्यात 21 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. परिस्थिती गंभीर असताना अनेकांचे प्राण वाचावे, यासाठी शहरात गर्दी करू नका, विनाकारण घराबाहेर फिरू नका, असा संदेश रेड कोरोनाद्वारे देण्यात आला.
महत्त्वाच्या चौकांत रेड कोरोना -
लाल रंगाचा आक्राळ-विक्राळ मुखवटा घालून एक व्यक्ती रेड कोरोनाच्या वेशात शहरातील मुख्य चौकात पोलिसांसह दाखल झाली. राजकमल चौक, जयस्तंभ चौक, चित्रा चौक, कॉटन मार्केट, इर्विन चौक या महत्त्वाच्या चौकात रेड कोरोनाद्वारे कोरोनाने अमरावतीकारांना नियमांचे पालन करून सुरक्षित राहा, असे आवाहन केले.
हेही वाचा - राज्यातील कोरोनाच्या प्रसारासाठी निवडणूक आयोग जबाबदार; मद्रास उच्च न्यायालयाचे ताशेरे